लाख मोलाचे ‘पाणी’़़़़मातीमोल!

By Admin | Updated: September 21, 2015 00:46 IST2015-09-21T00:46:11+5:302015-09-21T00:46:11+5:30

लाख मोलाचे ‘पाणी’़़़़मातीमोल! उदासीनता : पिण्याचे पाणी अक्षरश: जाते वाया, अवैध नळ कनेक्शनबाबतच्या माहितीचा अभाव

Million rupees 'water' water! | लाख मोलाचे ‘पाणी’़़़़मातीमोल!

लाख मोलाचे ‘पाणी’़़़़मातीमोल!

देवेंद्र पाठक ल्ल धुळे

शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन, तोटय़ा नसलेले नळ आणि पाईप लाईनच्या लिकेजेस्द्वारे दररोज लाखो लीटर पाणी वाहून जात असल्याचे लोकमतच्या टीमने शहरातील विविध भागात फिरून केलेल्या सव्रेक्षणातून स्पष्ट झाले आहे. शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन, तोटय़ा नसलेले नळ आणि पाईप लाईनवरील गळतीसंदर्भातील आकडेवारी सध्या महापालिकेकडे नसल्याची बाबही यातून स्पष्ट झाली आहे. लोकमतने केलेल्या सव्रेक्षणातून समोर आली आह़े लोकमतटीमने प्रत्यक्ष त्या भागात जाऊन सव्रेक्षण केले. त्यात देवपुरातील जुने देवपूर पोलीस ठाण्यानजिक रस्त्यावरच पाण्याचा व्हॉल्व्ह लिक असल्याने दिवसभर यातून पाणी थेट नाल्यात जात़े याबाबत कोणीही लक्ष देण्यासाठी तयार नसल्याचे दिसून आल़े शहरातील एल. एम. उदरु हायस्कूलच्या मागील बाजूस नळाला पाणी आले होत़े पाणी भरून झाल्यानंतर अंगणात पाणी मारताना महिला आढळून आली़ गटारीतदेखील पाणी सोडण्यात येत होत़े सहज विचारले असता गटारी घाणीने तुंबल्या आहेत़ गटारी स्वच्छ करण्यासाठी पाणी टाकले जात आहे, असे सहजपणे सांगण्यात आल़े महामार्गावरील कुंडाणे शिवारानजिक पाण्याच्या व्हॉल्व्हला गळती लागल्याचे दिसून आल़े त्यातून पाणी वाहत होत़े त्याठिकाणी महिला पाणी भरताना आढळून आली़ ब:याच दिवसांपासून या व्हॉल्व्हमधून पाणी वाया जात आह़े कोणाचेही याकडे लक्ष नसल्याचे महिलेने सांगितले. व्हॉल्व्हच्या आजूबाजूला पाण्याचे डबकेसुद्धा साचलेले आढळून आले. हे पाणी वाहून खुल्या जागेत पाण्याचा तलाव साचला आहे. याठिकाणी मुले पाण्यात पोहण्याचा आनंद लुटत होती़ ब:याच महिन्यांपासून ही स्थिती आह़े सांगूनही उपयोग होत नाही़ नेमके लिकेज कुठे आहे, हे सापडले नसल्याचे एका व्यक्तीने सांगितल़े मोहाडी उपनगरात छोटासा पूल बांधण्यात आला आह़े या पुलाच्या खालून पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन गेली आह़े या पाईप लाईनला गळती लागल्यामुळे हे लाख मोलाचे पाणी थेट गटारीतच वाया जात आहे. शिवाय त्या पाईप लाईनद्वारे गटारीचे पाणी थेट नागरिकांच्या घरार्पयत पोहचत आहे. ही गळतीही गेल्या अनेक दिवसांपासूनची असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पाणी मातीमोल होत आह़े वाया जाणारे पाणी वेळीच रोखण्याची गरज आह़े

शहरातील देवपूर भागासह महामार्गानजिक पाण्याच्या व्हॉल्व्हला मोठय़ा प्रमाणात गळती लागली आह़े याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याची बाब

गेल्या आठवडाभरात शहरात विविध भागात होणा:या पाणीपुरवठय़ाच्यावेळी

Web Title: Million rupees 'water' water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.