शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

शासनाच्या मदतीविना स्थलांतरितांची क्षुधा शांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:31 IST

बहुतांश मजूर परतले गावी : प्रवासाच्या परवानगी पूर्वीच १३८ मजुरांनी केले पलायन

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांसाठी जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या निवारागृहातील मजूर, कामगारांना आधार देण्यासाठी विविध सेवाभावी संस्था सरसावल्या व प्रशासनाच्या मदतीविना त्यांचे उदरभरण करण्यात आले. घरापासून कोसो दूर असताना पोटाची खळगी कशी भरणार या चिंतेत असतानाच आम्हाला विविध संस्थांनी मदत केल्याने आमची चिंता, मिटली, अशा भावनादेखील स्थलांतरितांनी व्यक्त केल्या. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील वेगवेगळ््या निवारागृहातील १३८ जणांनी पलायन केल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षाची अनुभूतीही या निमित्ताने आली.कोरोना विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये म्हणून सुरक्षिततेसाठी शासनाने लॉकडाउन जाहीर केले. यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांना काम नसल्याने त्यांनी आपापल्या गावी परतण्यास प्राधान्य दिले. जळगाव जिल्ह्याच्या सीमेवरदेखील पोलिसांनी हजारो नागरिकांवर कारवाई करून त्यांना जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या शासकीय निवारागृहामध्ये ठेवले. या निवारागृहात आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध आहे की नाही, या संदर्भात त्या पार्श्वभूमीवर भेट देऊन पाहणी केली असता या ठिकाणी प्रशासनाच्या मदतीपूर्वीच सेवाभावी संस्थांकडून मदत पुरविली जात असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे येथे दिल्या जाणाºया भोजन व इतर वस्तूंमुळे कशाचीही कमतरता भासत नसल्याचे स्थलांतरितांनी सांगितले.१३५२ स्थलांतरितांसाठी निवारागृहस्थलांतरित नागरिक व मजुरांसाठी जिल्हा प्रशासनाने जळगाव शहरात राधाकृष्ण मंगल कार्यालय, लाडवंजारी मंगल कार्यालय व गेंदालाल मिल गोडावून या तीन ठिकाणी तसेच कार्की फाटा, आरटीओ चेकपोस्ट हॉल, मुक्ताईनगर, पाचोरा, चाळीसगाव, चोपडा या ठिकाणी निवारागृह सुरु केले आहे. तर कामगार विभागानेही, भुसावळ, चोपडा आदी ६ ठिकाणी कामगारांसाठी निवारागृह सुरु केले आहे.शासकीय निवारागृहात ४४१ तर कामगार विभागाच्या निवारागृहात ९११ असे एकूण १३५२ स्थलांतरितांची सोय करण्यात आली आहे. शहरातील तीन निवारागृहामध्ये मध्यप्रदेशातील १११, उत्तरप्रदेशातील ७४, राजस्थानातील १४६ तर महाराष्ट्रातील ११० मजुरांचा समावेश आहे. लाडवंजारी मंगल कार्यालय, कर्की येथील निवारागृह येथे सेवाभावी संस्थांतर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आली.वेगवेगळ्या प्रकारची मदतनिवारागृहात असलेल्यांना सेवाभावी संस्था व लोकप्रतिनिधींच्या मदतीने त्यांच्या निवाºयाची, भोजनाची व इतर वस्तू देण्याची सोय केली जात आहे. या सर्व स्थलांतरित मजुरांना आंघोळीच्या वस्तू, रुमाल, भोजन, चादर अशा सर्व प्रकारच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू दिल्या जात आहे. तसेच या नागरिकांची वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणीही करण्यात येत असून त्यांचे समुपदेशनही केले जात आहे. या सोबतच मदतीमध्ये फळेदेखील येथे दिली जात आहे.मजुरांना धान्यऐवजी थेट भोजननिवारागृहात मजुरांना तयार जेवणच देण्यात येत आहे. या ठिकाणी प्रशासनातर्फे धान्य उपलब्ध करून देणार असले तरी सेवाभावी संस्थाच मोठ्या प्रमाणात अन्नधान्य व इतर वस्तू आणून देतात. त्यामुळे जळगावातील लाडवंजारी मंगल कार्यालयात स्वयंपाक करून तयार जेवण दिले जात आहे.प्रशासनाचे अपयशजळगाव शहरातील लाडवंजारी मंगल कार्यालयातून २९ एप्रिल रोजी सर्वच्या सर्व ४८ मजुरांनी सोबत पलायन केले. विशेष म्हणजे यात्रेकरू, विद्यार्थी, मजूर यांना गावी परतण्यासाठी सरकारने प्रवासाची परवानगी देण्यापूर्वीच मजुरांनी पलायन केले. या सोबतच कर्की फाटा, ता. मुक्ताईनगर येथील निवारागृहातूनदेखील ९० जणांनी पलायन केले.काय म्हणतात स्थलांतरित बांधव-घरासारखी काळजीनिवारागृहात राहत असलेले उत्तर प्रदेशातील विकास यादव म्हणाले की, आमच्या घरी जशी काळजी घेतली जाते, तशीच काळजी येथे घेत आहे. त्याबद्दल आम्ही जळगाव जिल्हा प्रशासन व विविध संस्था, मदत करणाºया व्यक्तींचे ऋणी असल्याचे ते म्हणाले.-आवश्यक गरजा होताहेत पूर्णकल्याण येथील जगदीश वानखेडे म्हणाले की, आम्हाला येथे आल्यापासून कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. आमच्या आवश्यक त्या सर्व गरजा पूर्ण होत आहे.-आनंदी आहोतघरात असताना जशी आपली काळजी घेतली जाते तशीच काळजी येथे घेतली जात आहे. आम्हाला येथे कशाचीही कमतरता पडत नसून आम्ही येथे आनंदी असल्याचे सुरज कुमार यांनी सांगितले. येथे जेवणाची कधी कमतरता भासली नाही.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव