शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इमर्जन्सी लोडशेडिंग विरोधात शेतकऱ्यांचे मध्यरात्री रास्तारोको

By चुडामण.बोरसे | Updated: September 1, 2023 12:54 IST

सुमारे ४०० ते ५०० शेतकरी झाले होते एकत्र

पारोळा जि.जळगाव : इमर्जन्सी लोडशेडिंगच्या नावाने सुरू केलेला विद्युत पुरवठा अवघ्या दहा मिनिटात बंद केल्याने  शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. पारोळा तालुक्यातील सुमारे ४०० ते ५०० शेतकऱ्यांनी रात्री  राष्ट्रीय महामार्गावर दगड ठेवून रास्ता रोको आंदोलन केले.

पाऊस नाही, पिके कोमेजली आणि त्यातही लोडशेडिंग आणि वीज सुरू केलीच तर आणखी इमर्जन्सी लोडशेडिंगच्या नावाने अवघ्या काही मिनिटात वीजपुरवठा बंद होत असल्याने सावखेडा ता.  पारोळा या फिडर अंतर्गत असलेल्या तुऱ्हाटखेडा , मऱ्हाटखेडा , कन्हेरे , सारवे , सांगवी , ईटवी ,विटनेर ,पळासखेडे खुर्द , पळासखेडे बुद्रुक दगडी सबगव्हाण, दहिगाव, मोहाडी , खेडीढोक ,राजवड आदी गावाचा वीजपुरवठा वारंवार  खंडित करण्यात आला. सुमारे ४०० ते ५०० शेतकरी एकत्र होऊन फिडर वरील वीज कर्मचार्यांना जाब विचारत असताना कर्मचाऱ्यांनी उद्धटपणे उत्तरे दिल्याने शेतकरी संतप्त झाले. रात्री बारा वाजेच्या सुमारास दगडे लावून सुरत- नागपूर राष्ट्रीय महामार्ग रोखला.

माजी आमदार साहेबराव पाटील यांनीही पोलिसांना घटना कळवली. मध्यरात्री डीवायएसपी सुनील नंदवाळकर , पारोळा पोलीस निरीक्षक सुनील पवार घटनास्थळी हजर झाले. आजूबाजूने मोठा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. नंदवाळकर यांनी वीज अभियंता मोरे याना पारोळा येथून झोपेतून उठवून घटनास्थळी नेले. वाहनांचे नुकसान होऊ नये अथवा प्रवासी वेठीस धरले जाऊ नये म्हणून वाहतूक पारोळा येथून राजवड मार्गे धरणगाव , एरंडोल अशी वळवण्यात आली होती. अखेर मोरे यांनी शेतकऱ्यांना वेळेवर वीज देण्याचे आश्वासन  देऊन कर्मचाऱ्यांच्या उद्धटपणाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पोलिसांच्या सहकार्याने जमाव शांत झाला.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव