मीटरमध्ये फेरफार करणा:यांना वीज वितरण कंपनीचा दणका
By Admin | Updated: July 7, 2017 12:07 IST2017-07-07T12:07:47+5:302017-07-07T12:07:47+5:30
जामनेरातील 11 ग्राहकांवर प्रत्येकी 11 हजार रु. दंडाची कारवाई

मीटरमध्ये फेरफार करणा:यांना वीज वितरण कंपनीचा दणका
ऑनलाईन लोकमत
जामनेर,दि.7 - वीज मीटरमध्ये फेरफार करून वीज वितरण कंपनीची फसवणूक करणा:या शहरातील 11 ग्राहकांवर येथील अधिका:यांनी प्रत्येकी 11 हजार रुपये दंडाची कारवाई केली.
उपकार्यकारी अभियंता विजय करारे, सहायक अभियंता एस.पी. राजपूत, अनिल सुरवाडे, विजय सुरवाडे, सतीश परदेशी, एकनाथ चांभार, राजेश परदेशी, योगेश पाटील, राजू महाले यांनी गुरुवारी शहरातील बशीरनगर, मदनीनगर या भागात कारवाई केली.
वीज वितरण कंपनीची ही कारवाई अजून चार ते पाच दिवस अशीच सुरू राहील, अशी माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली.