मेहता रुग्णालयात लसीकरण केंद्रावर गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:20 IST2021-09-23T04:20:06+5:302021-09-23T04:20:06+5:30
जळगाव : शहरातील चेतनदास मेहता रुग्णालयात बुधवारी चांगलाच गोंधळ उडाला होता. अनेक जण सकाळी सात वाजेपासून रांगा लावून बसले ...

मेहता रुग्णालयात लसीकरण केंद्रावर गोंधळ
जळगाव : शहरातील चेतनदास मेहता रुग्णालयात बुधवारी चांगलाच गोंधळ उडाला होता. अनेक जण सकाळी सात वाजेपासून रांगा लावून बसले होते. मात्र, त्यांना दुपारी २ वाजेनंतर लस मिळाली. याबाबत नागरिकांनी लसीकरण केंद्रावर त्रागा व्यक्त केला होता. या केंद्रावर लस मिळेल, या आशेने अनेक जण आले होते. मात्र, त्यातील अनेकांची निराशा झाली.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार सर्व केंद्रांवर लस उपलब्ध होती. त्यात अनेक जण चेतनदास मेहता रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी तेथे लसीकरण बंद असल्याचा फलक लागलेला होता. ऑनलाइन आणि ऑफलाइनची वेगळी रांग असली तरी अनेक जण ऑफलाइन नोंदणी करणाऱ्यांच्या रांगेत पुढे जाऊन लस मिळवीत असल्याची तक्रारदेखील अनेकांनी केली. मात्र, त्याकडे मनपाच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते.