फोटो..४ सीटीआर ४९
जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी येथील माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक विजय निंबाजी आमले यांना तात्यासाहेब ज्योतिराव फुले स्मृती दिनानिमित्त राज्य समता शिक्षक परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार ऑनलाईन जाहीर करण्यात आला.विजय आमले यांनी कोरोना काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण,कोरोना योध्दा म्हणून औटपोस्टवर केलेली सेवा व गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी केलेले परिश्रम यामुळे हा पुरस्कार देण्यात आला. संस्थेचे चेअरमन डॉ.एम.बी.पाटील, सचीव अरुण निकम, उपाध्यक्ष डॉ.संजय देशमुख, सहसचीव संजयसिंग रतनसिंग पाटील,अजय देशमुख, प्राचार्य शेखर देशमुख यांनी कौतुक केले आहे.
शिव वाहतूक सेनेची कार्यकारिणी बरखास्त
जळगाव : शिवसेनेशी अंगीकृत असलेली संघटना शिव वाहतूक सेनेची संपूर्ण कार्यकारिणी पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने बरखास्त करण्यात आली. यामुळे राज्यातील सर्वच जिल्हा, महानगर, तालुक्याच्या कार्यकारिणीही बरखास्त झालेल्या आहेत. नवीन कार्यकारिणी पक्ष प्रमुखांच्या आदेशाने लवकरच जाहीर करण्यात येईल, असे कळविण्यात आलेले आहे.
Web Title: Meritorious Teacher Award to Vijay Amle
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.