भडगाव येथे माऊली फाऊंडेशनतर्फे गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:18 IST2021-09-23T04:18:20+5:302021-09-23T04:18:20+5:30

यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले युवराज सूर्यवंशी, गुंताई सूर्यवंशी यांनी सेवानिवृत्त प्राचार्य गणेश पूर्णपात्री, जयश्री पूर्णपात्री, अण्णासाहेब हिरे, पंढरीनाथ पाटील, ...

Meritorious felicitation by Mauli Foundation at Bhadgaon | भडगाव येथे माऊली फाऊंडेशनतर्फे गुणवंतांचा सत्कार

भडगाव येथे माऊली फाऊंडेशनतर्फे गुणवंतांचा सत्कार

यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले युवराज सूर्यवंशी, गुंताई सूर्यवंशी यांनी सेवानिवृत्त प्राचार्य गणेश पूर्णपात्री, जयश्री पूर्णपात्री, अण्णासाहेब हिरे, पंढरीनाथ पाटील, बळवंत पाटील, शेख रफीक व करिमा खान यांना सन्मानपत्र, पुस्तक व गुलाबपुष्प देऊन गौरविले. यावेळी व्यासपीठावर भीमराव सूर्यवंशी, मंगला सूर्यवंशी, लक्ष्मीबाई सूर्यवंशी, दिलीप सहस्रबुद्धे , मोहसीन शेख, बब्बुशेठ आदी उपस्थित होते. यानंतर फाऊंडेशनच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर भडगाव शहरातील दहावी-बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात शमिका सोनजे, संवेद सुरवाडे, दिशा पाटील, चेतन नेरपगार, अनुष्का चव्हाण, दर्शन पाटील, ज्योती महाजन, आस्मा मिर्झा, सादिक खान, अलविरा खान, अलविरा शेख, ऋषिकेश वाघ, दिव्या राजपूत, विनोद बडगुजर, प्रज्ञा तांबटकर, स्वयम् पाटील, लीना पाटील, वृषाली भोई, मिर्झा मुस्कान, अश्विनी वाघ आणि अनुष्का शिंपी यांचा समावेश होता. गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच माऊली फाऊंडेशनच्या सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचाही सन्मान करण्यात आला. यात वैशाली पाटील यांचा तर संजय सोनार, जाकीर कुरेशी व देवेंद्र पाटील यांचा ‘कोरोना योद्धा’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. फाऊंडेशनच्यावतीने शिक्षक कार्यकर्त्यांचाही सन्मान करण्यात आला. यात सुशीलकुमार माळी, योगेश शिंपी, वैशाली पाटील, मनीषा पाटील, प्रतिभा कुलकर्णी, गणेश पाटील, प्रवीण पाटील, प्रा. डॉ. दिनेश तांदळे, प्रा. डॉ. दीपक मराठे, हेमंत खैरनार, अनिल दुसाने, दीपमाला जगताप, सुरेश रोकडे, गणेश देशमुख, प्रकाश पाटील यांचा समावेश होता.

यावेळी युवराज सूर्यवंशी, बळवंत पाटील, टिकाराम पाटील, प्रतीक्षा ततार, प्रतिभा कुलकर्णी, प्रवीण पाटील, जया सूर्यवंशी, वैशाली पाटील, जाकीर कुरेशी, मोहसीन शेख उपस्थित होते. सूत्रसंचालन योगेश शिंपी यांनी केले.

Web Title: Meritorious felicitation by Mauli Foundation at Bhadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.