भुसावळ खाटीक समाज बिरादरीतर्फे गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 02:14 PM2020-12-30T14:14:10+5:302020-12-30T14:14:33+5:30

खाटीक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा खाटीक समाज बिरादरीतर्फे शाळा क्रमांक तीनमध्ये सत्कार करण्यात आला.

Meritorious felicitation by Bhusawal Khatik Samaj Biradari | भुसावळ खाटीक समाज बिरादरीतर्फे गुणवंतांचा सत्कार

भुसावळ खाटीक समाज बिरादरीतर्फे गुणवंतांचा सत्कार

Next

भुसावळ : शहरातील खाटीक समाजातील दहावी व बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा खाटीक समाज बिरादरीतर्फे शाळा क्रमांक तीनमध्ये सत्कार करण्यात आला. करीम सालार, मुप्ती हारून नदवी आदी मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
खाटीक समाजातील मुलांमध्ये इतर समाजातील मुलांप्रमाणे शिक्षणाविषयी आवड निर्माण होऊन समाजाचा अधिक चांगल्याप्रकारे विकास व्हावा या मुख्य उद्देशाने खाटीक समाज बिरादरीतर्फे हा कार्यक्रम बुधवारी आयोजित केला होता. तसेच समाजातील जी मुले हुशार आहेत मात्र परिस्थितीनुसार ते उच्च शिक्षण घेऊ शकत नाही अशा हुशार विद्यार्थ्यांना अखिल भारतीय मुस्लीम खाटीक समाजातर्फे शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाईल, असेदेखील यावेळी मान्यवरांनी सांगितले.
 

Web Title: Meritorious felicitation by Bhusawal Khatik Samaj Biradari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.