माध्यमिक विद्यालय वडती येथील २ विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:18 IST2021-08-22T04:18:47+5:302021-08-22T04:18:47+5:30
गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना इ. ९ वी ते १२ वीपर्यंत प्रतिवर्ष प्रत्येकी १२ हजार रुपये म्हणजे चार वर्षात ...

माध्यमिक विद्यालय वडती येथील २ विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत
गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना इ. ९ वी ते १२ वीपर्यंत प्रतिवर्ष प्रत्येकी १२ हजार रुपये म्हणजे चार वर्षात एका विद्यार्थ्यासाठी ४८ हजार शिष्यवृत्ती मिळणार आहे. यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खूप मोठी आर्थिक मदत होते.
विद्यालयातील एकूण ९ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी २ विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.
७ वर्षांपासून एनएमएमएस परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविण्याची परंपरा या विद्यालयाने कायम ठेवली आहे. शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थी आइसा हमीद तडवी, रिजवाना खलील तडवी या विद्यार्थिनी आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गुलाबराव पाटील, उपाध्यक्ष एम. एस. चित्रकथी, सचिव दीपक भास्कर जोशी तसेच सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक संजय हरी जोशी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.