पारोळा येथे महादेव मंदिरासाठी व्यापारी महासंघाची मदतफेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:16 IST2021-07-29T04:16:25+5:302021-07-29T04:16:25+5:30

या प्राचीन महादेव मंदिरात दर वर्षी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सत्यनारायणाची महापूजेचे आयोजन करण्यात येते. परंतु मागील ...

Merchant Federation's aid tour for Mahadev Temple at Parola | पारोळा येथे महादेव मंदिरासाठी व्यापारी महासंघाची मदतफेरी

पारोळा येथे महादेव मंदिरासाठी व्यापारी महासंघाची मदतफेरी

या प्राचीन महादेव मंदिरात दर वर्षी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सत्यनारायणाची महापूजेचे आयोजन करण्यात येते. परंतु मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे या सार्वजनिक महापूजेला खंड पडला आहे. यावर्षी पारोळा व्यापारी मंडळाच्यावतीने या मंदिराचे रंगरंगोटी करून तसेच डागडुजी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यात संपूर्ण शहराचा हातभार लागावा, म्हणून कामकरी कष्टकरी व्यापारीवर्गाकडून संपूर्ण बाजारपेठ, कजगाव रोड, बस स्टॅण्डकडील संपूर्ण भागात फिरून मंदिरासाठी मदतफेरी काढण्यात आली.

यावेळी अनेक लहान-मोठ्या व्यापारी लोकांनी मदतफेरी घेऊन जाणाऱ्या व्यापारीवर्गाला मदत केली. यावेळी पारोळा व्यापारी महासंघाचे केशव क्षत्रिय, अशोक लालवाणी, संजय कासार, अरुण वाणी, विलास वाणी, नगरसेवक नितीन सोनार, शंकर हिंदुजा, प्रकाश शिंपी, प्रमोद शिरोळे, देवीदास वाणी, महेश हिंदुजा, आकाश महाजन, अमोल वाणी, गजेंद्र वाणी उपस्थित होते.

Web Title: Merchant Federation's aid tour for Mahadev Temple at Parola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.