मनपातील गैरव्यवहारांची सरकारी यंत्रणेकडून चौकशी व्हावी : एकनाथ खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:17 IST2021-05-11T04:17:16+5:302021-05-11T04:17:16+5:30
जळगाव : महापालिकेतील गैरव्यवहारांच्या अनेक तक्रारी वारंवार येत असून त्याची सरकारी यंत्रणेकडून चौकशी व्हायला हवी, असे मत माजी मंत्री ...

मनपातील गैरव्यवहारांची सरकारी यंत्रणेकडून चौकशी व्हावी : एकनाथ खडसे
जळगाव : महापालिकेतील गैरव्यवहारांच्या अनेक तक्रारी वारंवार येत असून त्याची सरकारी यंत्रणेकडून चौकशी व्हायला हवी, असे मत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. या विषयी याबाबत मी स्वतः लक्ष घालून आहे, असेही ते म्हणाले.
एकनाथ खडसे सोमवारी दुपारी जळगावात आलेले होते. आपल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्यावर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. भाजपने नेहमी ओबीसी नेत्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. मात्र सध्या चित्र बदलले आहे. भाजपच्या काही नेत्यांकडून ओबीसी नेत्यांना त्रास दिला जात आहे. चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांना तुम्ही जामिनावर आहात असे म्हणणे म्हणजे धमकीच देणे असून यावरून माझ्यामागे ईडी लावण्याचे षडयंत्र यांचेच असल्याचे स्पष्ट झाले होते, असा आरोपही खडसे यांनी केला.