संवादाची दरी बिघडवु शकते मानसिक स्वास्थ्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:21 IST2021-09-08T04:21:00+5:302021-09-08T04:21:00+5:30
डमी नंबर : ११३८ आकाश नेवे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : क्वारंटाईन किंवा आयसोलेशन हे प्रकार संपूर्ण जगासमोर ...

संवादाची दरी बिघडवु शकते मानसिक स्वास्थ्य!
डमी नंबर : ११३८
आकाश नेवे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : क्वारंटाईन किंवा आयसोलेशन हे प्रकार संपूर्ण जगासमोर १९९८ नंतर पहिल्यांदाच आले आहेत. पूर्वीच्या काळी प्लेगच्या साथीमध्ये नागरिकांना याचा सामना करावा लागत होता. आता प्रथमच सर्वांना याचा सामना करावा लागला. कोविड काळात सामाजिक जीवनदेखील बंद झाले. त्यामुळे घरातच ऑनलाइनच्या माध्यमातून का होईना, पण प्रत्येकाने आपला एक सुखी कोपरा शोधला होता. आता पुन्हा एकदा हळूहळू सामाजिक जीवनाला सुरुवात होत आहे. त्यामुळे अनेकांना चिडचिड होणे, तणाव, नैराश्य यांचा सामना करावा लागत आहे. त्यात संवाद साधणे आणि नियमित कर्तव्यपूर्ती करणे हे उत्तम उपाय असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहेत.
सध्या काळात घरात बंद असताना सर्वांनाच सायबरचा आधार मिळाला. प्रत्यक्ष जीवन बंद झाले आणि व्हर्च्युअल जीवन सुरू झाले. व्यक्तींचा संबंध फारसा राहिला नाही. त्यामुळे विलगीकरणातील आयुष्याचीच सर्वांना सवय झाली. काम करतानादेखील घरात सोयीने काम करण्यावर भर वाढला. हीच सवय नागरिकांमध्ये वाढली; मात्र आता सामाजिक जीवन पुन्हा सुरू झाल्यावर हा साचा बदलला, त्यामुळे अनेकांमध्ये चीडचीड वाढली आहे. ज्यांनी या काळात फारसा संवाद साधला नाही. त्यांच्यासमोर अशा समस्या वाढल्या आहेत. ही समस्या मुलांमध्ये जास्त आहे. मोठ्यांमध्ये आर्थिक नुकसानामुळे मानसिकदृष्ट्या खचल्याच्या केसेस जास्त असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
कोट - सध्याच्या काळात चिडचिड, ताणतणाव अशा समस्या आहेत. आधी सर्वांनाच बाहेर जावे लागत होते; मात्र अचानक हे बाहेर जाणे बंद झाले आणि आता पुन्हा बाहेर जावे लागते. त्यामुळे व्यक्तींचा संबंध येतो आणि तणाव निर्माण होते. हा तणाव वाढू नये, यासाठी बदलत्या परिस्थितीशी कसे जुळवून घ्यायचे, व्यायाम करणे, कामाच्या वेळा निश्चित करणे, असे उपाय करावे. जास्त अडचण असेल तर समुपदेशन महत्त्वाचे ठरते. - नीरज देव, मानसोपचार तज्ज्ञ.
काय आहेत उपाय
- बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे
- मानसिक क्षती दूर करावी, उठायची वेळ निश्चीत करा
- व्यायाम करा, नेहमीची कामे करायची आहे, ही कर्तव्यभावना ठेवावी
- चिंता, उदासिनता, हताशता असेल तर समुपदेशन करावे
- नव्या वेगाने जीवनात प्रवेश करावा