शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

महिलांच्या रेशन दुकानांवर पुरुषांची मक्तेदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 23:17 IST

रेशन दुकानांचा कारभार महिलांच्या हाती कागदावर दिसत असला तरी सेल्समन या गोंडस नावाखाली रेशन दुकाने प्रत्यक्षात पुरुष मंडळीच हाताळताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देरेशन दुकानांची स्थितीमहिला नामधारी अन् पुरुष कामधारी

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : महिला स्वावलंबन आणि सक्षमीकरण म्हणून रेशन दुकाने महिला व त्यांच्या बचत गटामार्फत चालविले जात आहे. रेशन दुकानांचा कारभार महिलांच्या हाती कागदावर दिसत असला तरी सेल्समन या गोंडस नावाखाली रेशन दुकाने प्रत्यक्षात पुरुष मंडळीच हाताळताना दिसून येत आहे. महिला नामधारी तर पुरुष कामधारी असे चित्र रेशन वितरण प्रणालीचे झाले आहे, तर शासनाचे महिला सक्षमीकरणाचे हेतू इमाने इतबारे पूर्ण करणाऱ्याचे कार्य खºया स्वरूपात तालुक्यातील फक्त २ महिला दुकानदार समर्थपणे पार पाडत आहे. त्या स्वत:च संपूर्ण कारभार आपल्या हाताने करीत आहे.तालुक्यातील स्वस्त धान्य वितरण प्रणालीत एकूण८५ रेशन दुकाने आहेत. यात २४ महिला दुकानदार तर ९ दुकाने महिला बचत गटांची आहेत. अशा स्वरूपात ८५ पैकी एकूण ३३ दुकानांचा कारभार महिलांच्या हाती कागदावर आहेत. यामुळे रेशन वितरण व्यवस्थेत महिला सक्षमीकरण व स्वावलंबनाचे कार्य इष्टांक पूर्तीकडे असल्याचे तसेच शासकीय वितरण व्यवस्थेतील महिलांचा सहभाग यशस्वीपणे सुरू झाल्याचे प्रशासनाला समाधान आहे.हेतू फक्त ७ टक्के यशस्वीअधिकतर दुकानांवर सेल्समन म्हणून पुरुष मंडळी काम पाहत आहे. ३३ पैकी फक्त दोन महिला रेशन दुकानदार सक्षमपणे कारभार सांभाळणे तर अपवाद म्हणून एखाद दुसरी महिला कधीतरी दुकानावर दिसून येते. मात्र उर्वरित ठिकाणी पुरुषांची मक्तेदारी दिसून येते या अनुषंगाने रेशन वितरण प्रणालीत महिला सक्षमीकरणाचा हेतू अवघ्या ७ टक्केच्या आत यशस्वी होत असल्याची स्थिती मुक्ताईनगर तालुक्यात दिसून आली आहे.स्त्रिया काय पोते उचलणार?अशात महिला सक्षमीकरणाचा हेतू उदात्तपणे किती यशस्वी आहे. प्रत्यक्षात किती महिला स्वत: रेशन दुकानांचा कारभार हाताळत आहे याची वास्तविकता जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता महिलेच्या नावे असलेले रेशन दुकान प्रत्यक्षात घरातील कर्ता पुरुष किंवा महिलेचे मूल सांभाळत असल्याचे दिसून आले आहे. महिलांच्या रेशन दुकानांवर पुरुष कारभार करताय, याचे कारण विचारले तर सेल्समन म्हणून काम पाहत आहे. दुकान चालवायचे काम जरी स्त्रिया करीत असल्या तरी धान्याचे पोते हे ५० किलो आहेत त्यांची थप्पी लावणे, थप्पीतून एक एक पोते बाहेर काढणे यासाठी माणूस लागतोच. परिणामी सेल्समनमार्फत काम घेतले जाते, असे सहज आणि प्रति प्रश्नाला एकच सरळ उत्तर मिळाले२४ दुकाने महिलांचीमुक्ताईनगर (२), रुईखेडा, पिंप्रीनांदू, नायगाव, मेंढोदे लोहरखेडा, मुंढोळदे, शेमळदे, खामखेडा, दुई, रिगाव कोरहाळा, बोदवड, हलखेडा, बोरखेडा, कुंड, मेहुण, चिंचखेडा खुर्द, पतोंडी तालखेडा, पंचाणे, नांदवेल व डोलारखेडा ही २४ दुकाने महिलांच्या नावे आहेत.९ दुकाने बचत गटाचीभोकरी बेलसवाडी पूरनाड, वायला, वडोदा, निमखेडी बुद्रूक, चिंचखेडा बुद्रूक, बोरखेडा नवे आणि पिंप्री पंचम ही ९ रेशन दुकाने महिला बचत गटाच्या नावावर आहेतदोन महिला दुकानदार समर्थएकूण ३३ दुकाने महिलांच्या आहेत. या सर्वच दुकानांवर सेल्समन म्हणून किंवा सहायक माणूस कामाला आहे. परंतु मुक्ताईनगर येथील रेखा अमोल अग्रवाल आणि नांदवेल येथील मनीषा संदीप पाटील या दोन भगिनी अशा आहेत की, स्वत:च्या रेशन दुकानांची जवाबदारी त्या स्वत: हाताळत आहेत. अगदी आॅनलाईनची कामे चलन भरणे, बँकिंग आणि स्वत:च पुरवठा विभागात येऊन अडचणी सोडवतात नव्हे तर रेशन दुकानदार बैठकीतही हजर राहतात. येणाºया अडीअडचणी धाडसी पणे तहसीलदार समक्ष मांडतात. त्यांचा हा धाडसीपणा आणि जवाबदारीपूर्ण कार्य इतर महिला दुकानदारांसाठी अनुकरणीय आहे.तालुक्यात महिला व बचत गटाच्या माध्यमातून जी रेशन दुकाने चालविले जात आहे. यात अधिकतर ठिकाणी सेल्समन काम पाहत आहे. ही वस्तुस्थिती आहे. मात्र नियमाबाहेर नाही, तर काही महिला दुकानदारही उत्कृष्टपणे रेशन दुकान सांभाळत आहे. त्यांच्या कामाची छाप नीटनेटकेपणे व अपडेट असलेल्या रेशन दुकान दप्तरातून दिसून येते.-ऋषी गवळे, पुरवठा अधिकारी, मुक्ताईनगर

टॅग्स :foodअन्नMuktainagarमुक्ताईनगर