शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
3
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
4
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
5
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
6
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
7
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
8
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
9
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
10
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
11
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
12
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
13
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
14
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
15
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
16
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
17
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
18
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
19
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
20
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव पालिकेचे खुले नाट्यगृह जपतेय बालगंधर्वांच्या ऋणानुबंधाच्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 12:26 IST

विशेष परवानगीसाठी शासनाकडे पाठपुराव्याची गरज

जळगाव : एफएसआयअभावी बालगंधर्व खुल्या नाट्यगृहाचे बंदीस्तीकरण रखडले आहे. जळगावातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून बालगंधर्वांच्या जळगावशी ऋणानुबंधाच्या आठवणी जपण्यासाठी हे खुले नाट्यगृह बंदिस्त करावे, अशी अपेक्षा रसिकांकडून व्यक्त होत आहे.नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व जळगावात त्यांच्या शास्त्रीय संगीत शिक्षणाचा पाया घातला गेला. जळगावातील उस्ताद मेहबूब खान हे त्यांचे पहिले गुरू. बालगंधर्व म्हणून ते नटसम्राट पदाला पोहोचल्यावरही जळगावला आवर्जून भेट देत. जळगावला १९०७मध्ये भरलेल्या पहिल्या कविसंमेलनालाही ते उपस्थित होते.पालिकेने जपल्या आठवणीबालगंधर्वांच्या या आठवणी जपण्यासाठी त्यांच्याच नावाने ‘बालगंधर्व खुले नाट्यगृह’ तत्कालीन नगरपालिकेने उभारले. त्याचा कोनशिला शुभारंभ २१ सप्टेंबर १९६० रोजी राज्याचे तत्कालीन महसूल उपमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते झाला. यावेळी पालिकेचे अध्यक्ष जयवंतराव खंडेराव पाटील, उपाध्यक्ष सुकदेवराव गणपतराव यादव उपस्थित होते.तर २९ जानेवारी १९६१ मध्ये या खुल्या नाट्यगृहाचे उद्घाटन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी तत्कालीन नगराध्यक्ष बाजीराव भगुलाल श्रावगी, उपाध्यक्ष काशिनाथ हरी कोळी, पालिका अभियंता एन.के. बोंडे उपस्थित असल्याचे कोनशिलेवर नमूद आहे.अडचण काय?निविदा न येण्याचे कारण म्हणजेच ठेकेदाराला गुंतवणुकीच्या बदल्यात परतावा मिळण्याची शाश्वती काय? हे आहे.बंदीस्त करण्याचा संकल्प अपूर्णचत्यानंतर या खुल्या नाट्यगृहाचे बंदिस्त नाट्यगृहात रूपांतर करण्याचा निर्णय १९८८ मध्ये बालगंधर्व शताब्दी सोहळ्याप्रसंगी घेण्यात आला. बालगंधर्व खुले नाट्यगृह व नवीन बी.जे. मार्केटचा सर्व्हे क्रमांक एकच असल्याने व एफएसआय बी.जे. मार्केटसाठी वापरला गेल्याने हे खुले नाट्यगृह बंदिस्त करण्यासाठी नगररचना विभागाची परवानगी मिळणे अशक्य असल्याने हे काम रखडले. हे काम बीओटी तत्वावर देखील होणे अशक्य असल्याचे चित्र आहे.विशेष बाब म्हणून परवानगी आवश्यकअपुऱ्या एफएसआय अभावी नाटयगृह बदिस्त करण्याचे काम रखडले असून बीओटी तत्त्वावरदेखील हे काम होणे अशक्य असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अन्य पर्याय न सापडल्यास शासनाने विशेष बाब म्हणून मंजुरी देऊन हे काम मार्गी लागू शकेल. यासाठी पाठपुरावा करून बालगंधर्वांच्या जळगावशी ऋणानुबंधाच्या आठवणी जपण्यासाठी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव