शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कळमसरे पाझर तलाव पहिल्याच पावसात तुडूंब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 19:54 IST

डार्क झोनमध्ये असलेल्या कळमसरे या अमळनेर तालुक्यातील गावातील नागरिकांनी शासनावर अवलंबून न राहता श्रमदान करून हरशा या पाझर तलावाची उभारणी केली. शनिवारी रात्री झालेल्या पहिल्याच जोरदार पावसामुळे हा पाझर तलाव तुडूंब भरला असून गावकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले आहे.

ठळक मुद्देगावकºयांनी श्रमदानातून उभारलेल्या तलावात झाला ७५ टक्के जलसाठाग्रामस्थांचा आनंद गगनात मावेना,भरलेला तलाव पाहण्यासाठी गर्दीपरिसरातील विहिरी रिचार्ज होण्याची आशा

आॅनलाईन लोकमतकळमसरे, ता. अमळनेर : स्वत:ची समस्या स्वत:च सोडवली पाहिजे या उक्तीने प्रभावित होवून अवघ्या दोन महिन्यात गावकºयांनी सुमारे ८ हेक्टर पडीत क्षेत्रात श्रमदानातून भव्य असा हरशा नामक पाझर तलाव उभारला अन् शनिवारी रात्री झालेल्या जोरदार वृष्टीने सुमारे ७५ टक्के जलसाठा या तलावात झाला असून ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनाशा झाला आहे.कळमसरे गावाच्या दक्षिण सीमेलगत असलेल्या पडीत क्षेत्रात ग्रामस्थांनी पाझर तलाव उभारण्याचा विडा उचलला. जानेवारी महिन्याच्या शेवटी श्रमदानाला सुरुवात केली. तीन महिन्यात ग्रामस्थांचे तलावाचे स्वप्न साकार झाले. पावसाच्या प्रतीक्षेत असतांना दरवर्षीच्या ७ जून तारखेचे वेळापत्रक ब्रेक करत, चतुर्थीलाच जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. संध्याकाळी वादळ-वारा, वीज गायब, आकाशात विजांचा कडकडाट अशा आक्रमक स्वरुपात पावसाने हजेरी लावली अन् दुसºया दिवशी रविवारी सकाळी पाझर तलाव तुडूंब भरल्याचे पाहताच गावकºयांनी एकच जल्लोष केला. तलाव भरल्याचे वृत्त समजताच नागरिकांनी चिखल तुडवून त्याला गाठले. आणि यावेळी चेहºयावर आनंदाची झळाळी पसरली.या तलावाची निर्मिती १९७२ साली झाली होती, परंतु पाणी साठा असलेला हाच तो हरशा तलाव याची प्रचिती श्रमदानानंतर जाणवू लागली. शासनाकडे पाठपुरावा करून ही निधी मिळत नव्हता, गाव डार्क झोन क्षेत्रात असल्याने बागायती तर संपल्या पण पिण्याच्या पाण्याचे हाल होत होते. या नैराश्यातून कळमसरे ग्रामस्थांना श्रमदानाची उभारी आली. ओझर येथील उद्योगपती संतोष लढ्ढा, आयकर आयुक्त संदीप साळुंखे यांनी मशिनरी उपलब्ध करून दिली आणि जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सुटीचा दिवस या तलावाच्या श्रमदानात घालवून ग्रामस्थांचा उत्साह वाढविला.श्रमाला फळ लाभले या भावनेने समस्त ग्रामस्थांनी मदतकर्त्यांचे आभार मानले. सर्वप्रथम ‘लोकमत’ ने सविस्तर वृत्त प्रसिध्द करून या पडीत क्षेत्राकडे गावकºयांचे लक्ष वेधले त्यामुळेच चालना मिळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यंदा पावसाळा चांगला राहीला तर मार्च अखेरपर्यंत या तलावात साठा राहू शकतो असा अंदाज वयोवृध्द शेतकºयांनी व्यक्त केला.तीन महिन्यात ३९० मीटर लांब, ८ मीटर रुंद, ४ मीटर उंच एवढा यु आकाराच्या या तलावात खेडी व वासरे या सिमेलगतच्या गावाकडून वाहत येणारे पाणी अडविण्यात आले आहे. त्यामुळे कळमसरे, खेडी, वासरे या गावांना सिंचनाचा मोठा फायदा होणार असून, विहीरी रिचार्ज होऊ शकतील. बागायती क्षेत्रात वाढीबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्या काही अंशी सुटेल. 

टॅग्स :Rainपाऊस