शिक्षक नियुक्तीसाठी होणार ‘मेगा कॅम्प’
By Admin | Updated: November 18, 2015 01:17 IST2015-11-18T01:17:54+5:302015-11-18T01:17:54+5:30
शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलीची प्रक्रिया सध्या गतिमान झालेली दिसून येत आहे. इतर जिल्ह्यांतून धुळे जिल्ह्यात येणा:या शिक्षकांना सध्या संबंधित जिल्हा परिषदेकडून कार्यमुक्त करण्यात येत आहे.

शिक्षक नियुक्तीसाठी होणार ‘मेगा कॅम्प’
धुळे : शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलीची प्रक्रिया सध्या गतिमान झालेली दिसून येत आहे. इतर जिल्ह्यांतून धुळे जिल्ह्यात येणा:या शिक्षकांना सध्या संबंधित जिल्हा परिषदेकडून कार्यमुक्त करण्यात येत आहे. कार्यमुक्त होऊन धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे हजर झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यात रिक्त पदावर नियुक्ती देण्यासाठी शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेमध्ये 10 डिसेंबर रोजी एकूण 245 शिक्षकांना यादिवशी नियुक्त्या देण्यात येणार आहेत. अपंग, विधवा, परित्यक्ता यांना रस्त्यावरची सोयीस्कर गावे देण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून नियोजन सुरू आहे. पारदर्शक प्रक्रियेसाठी प्रयत्न जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी शिक्षकांना एकाच दिवशी नियुक्तीसाठी शिक्षण विभागाकडून खबरदारी शिक्षण विभागाकडून आंतर जिल्हा बदली देताना ब:याच गोष्टींची खबरदारी घेण्यात आली आहे. नियुक्ती दिल्यानंतर पुन्हा अडचण येऊ म्हणून काही सूचनाही शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. संबंधित प्राथमिक शिक्षकाची पदोन्नती मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख किंवा विस्तार अधिकारी पदावर झाली असल्यास त्यांना कार्यमुक्त न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही बदली विनंतीनुसार असल्याने शिक्षकांना शून्य ज्येष्ठतेनुसार हजर करून घेण्यात येणार आहे. तसेच संबंधित शिक्षकांना बदली प्रवास भत्ता दिला जाणार नाही. पूर्वीच्या जि.प.कडे असलेली कोणत्याही प्रकारची खाते चौकशी व थकबाकीस जि.प. जबाबदार राहणार नाही. तसेच शासनाने विहित केलेली परीक्षा, प्रशिक्षण पूर्वीच्या जि.प.मध्ये उत्तीर्ण नसल्यास ते विहित मुदतीत पूर्ण करावे लागेल. या सर्व अटींनुसारच नियुक्ती दिली जाणार आहे. सुटी संपल्याने प्रक्रियेला वेग 245 शिक्षकांची यादी 11 नोव्हेंबरलाच जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला टाकण्यात आली आहे. त्यानंतर दिवाळीची सुट्टी आल्याने 16 नोव्हेंबरपासून पुन्हा प्रक्रियेला वेग आला आहे. प्रशासकीय प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. ज्या जिल्ह्यातून धुळे जिल्ह्यात हे शिक्षक येणार आहेत त्यांची यादी संबंधित जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिका:यांना पाठविण्यात आली आहे.