रोटरी क्लब पाचोरा भडगावची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:12 IST2021-07-05T04:12:48+5:302021-07-05T04:12:48+5:30

रोटरी क्लबचे उपप्रांतपाल राजेश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीत रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील यांनी गतवर्षाच्या ...

Meeting of Rotary Club Pachora Bhadgaon | रोटरी क्लब पाचोरा भडगावची बैठक

रोटरी क्लब पाचोरा भडगावची बैठक

रोटरी क्लबचे उपप्रांतपाल राजेश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीत रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील यांनी गतवर्षाच्या कार्यकाळातील उपक्रमांची उजळणी सदस्यांना करून दिली.

यावेळी उपप्रांतपाल राजेश मोर यांनी आपल्या मार्गदर्शनात रोटरी क्लबच्या आधारभूत सामाजिक उपक्रमांची माहिती सांगितली. आगामी वर्षात स्थानिक रोटरी क्लबचे उपक्रम समाजोपयोगी व अभिनव असावेत, याबाबत सूचना केल्या. नूतन वर्षाच्या पदग्रहण समारंभाबाबतचे नियोजन व संचलन याबाबत रोटेरियन राजेश मोर यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत शैलेश खंडेलवाल यांनी मनोगत व्यक्त केले. नूतन अध्यक्ष डॉ.बाळकृष्ण पाटील यांनी आगामी वर्षाचे प्राथमिक नियोजन व नियोजित उपक्रमाबाबतचा आराखडा सदस्यांसमोर मांडला.

क्लबचे सचिव डॉ.अमोल जाधव यांनी आभार प्रकटन केले. वर्षपूर्तीच्या या महत्त्वपूर्ण बैठकीला डॉ.गोरख महाजन, शिवाजी शिंदे, डॉ.स्वप्निल पाटील, अतुल शिरसमणे, डॉ.पवन पाटील, डॉ.वैभव सूर्यवंशी आदी सदस्य उपस्थित होते.

Web Title: Meeting of Rotary Club Pachora Bhadgaon