शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

प्रत्येक टप्प्यावर भेटले मार्गदर्शक शिक्षक - सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 13:43 IST

शिक्षकांच्या हाती देशाचे भवितव्य, त्यांच्या मार्गदर्शनावरच घडत असते पिढी

जळगाव : प्राथमिक शिक्षकांपासून ते अधिकारी बनण्यापर्यंतच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यांवर आपल्याला मार्गदर्शक भेटत गेले ते आपल्यासाठी शिक्षक होते़, असे मत जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी व्यक्त केले आहे़ शिक्षक दिनाच्या पूर्व संध्येला त्यांच्याशी संवाद साधला असता, शिक्षकांच्या हाती खरे देशाचे भवितव्य असते, असेही ते म्हणाले़ केवळ शाळेत शिक्षकविणारे शिक्षक नसतात आयुष्यात तुम्हाला वेगवेगळ्या मार्गांवर मार्गदर्शन करणारी व्यक्ती असतात, त्यांच्यामुळे तुम्ही योग्य मार्गावर जावून काहीतरी प्राप्त करीत असतात, असे मार्गदर्शक हे शिक्षकच़ शिक्षकांची भूमिका ही अनन्य साधारण आहे आहे़पिढी घडविण्याचे काम ते करीत असतात, त्यांनी दिशा दिल्यानंतरच विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहचत असतात़ डॉ़ बी़ एऩ पाटील यांचे तळवाडे, ता़ सटाणा येथे प्राथमिक शिक्षण झाले़ नाशिक येथे माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर बीएस्सी व एमएस्सी पुणे येथे झाले़ त्यांनी राजस्थान विद्यापीठातून पर्यावरण शास्त्रावर पीएच़डी केली़ त्यांनी जर्मनी येथे पर्यावरण व्यवस्थापनाचा कोर्स केला़ त्यांना युनाटेड नेशनसह विदेशात अनेक फेलोशीप मिळाल्या़ जलव्यवस्थापनावरही त्यांचे चांगले संशोधन आहे़विद्यार्थ्यांना संकल्पना समजणे गरजेचेमुल्य आधारीत शिक्षण देणे ही काळाची गरज आहे़ विद्यार्थ्यांना संकल्पना समजणे व या शिक्षणाचा दैनंदिन जीवन जगताना उपयोग होणे महत्त्वाचे आहे़ शिक्षणातून विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास होणे अपेक्षित आहे़ भौतीक, बौद्धीक व नैतीक या तीनही पातळ्यांवर समान विकास होणे गरजेचे आहे, असेही सीईओंनी सांगितले़यशस्वी पिढी घडविण्याचे काम शिक्षकांचे़़़शिक्षण पूर्ण करून सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील हे प्रशासकीय सेवेत कार्यरत झाले़ गेल्या सहामहिन्यापूर्वीच त्यांनी जळगाव जिल्हा परिषदेत पदभार घेतला आहे़ तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी अनेक शाळांना भेटी दिल्या़ तसेच शिक्षकांशीही चर्चा केली़ पुढची यशस्वी पिढी घडविण्याचे काम हे शिक्षकांचे असते, त्यासाठी शिक्षकही उत्तम अध्यापन करतात़ जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांचा इतर शिक्षकांनी आदर्श घ्यावा, व आठवणीत राहतील असे विद्यार्थी घडवावे, असेही त्यांनी सांगितले़शिक्षकांनी खरोखर चांगला विद्यार्थी घडवावे़ कारण पायाच कच्चा राहिल्यास देश उभारणी कशी होणाऱ शिक्षकांवर देशाचे भवितव्य व विकास अवलंबून असतो़ हे लक्षात घेऊन अध्यापन करण्याची गरज आहे. शिस्त व शिक्षणातून पिढी घडविण्यासाठी शिक्षकांनी पुढे यायला हवे.

टॅग्स :Jalgaonजळगाव