शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वाघारी येथे कारवाईस गेलेले वैद्यकीय पथक इंजेक्शन न देता माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 00:00 IST

फत्तेपूर येथे दोन डॉक्टरांना नोटीस देण्यात आल्या आहेत.

जामनेर : वाघारी (ता. जामनेर ) येथील डॉक्टर पती -पत्नी कोरोना काळात शासन निर्देशांचे पालन न करता रुग्णावर उपचार करीत असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागास मिळाल्या होत्या. आरोग्य विभागाचे पथक कारवाईसाठी वाघारी येथे गेले असता पथकाला ठोस पुरावे मिळाले नसल्याने कारवाई झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, राजकीय दबावामुळे डॉक्टरांना कारवाईचे इंजेक्शन आरोग्य विभागाला देता आले नसल्याची चर्चा रंगू लागली आहे, तर दुसरीकडे डॉ. देवानंद सरताळे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८६ नुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.वाघारी व परिसरात गेल्या महिनाभरात सुमारे ३० पेक्षा जास्त कोरोना संशयितांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी अनधिकृतपणे गर्भपात केले जात असल्याची चर्चा होती व तशी तक्रार जिल्हा आरोग्य विभागाकडेदेखील पोहोचली होती. या अनुषंगाने स्थानिक अधिकाऱ्यांनी तपासणी केली. कारवाईची कुणकुण लागताच संबंधितांनी कागदपत्रांची फाइल व इतर साहित्य हलविल्याचे सांगण्यात आले.या डॉक्टरांवर कारवाई होऊ नये यासाठी मोठा राजकीय दबाव आणण्यात आल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.फत्तेपूरला दोन रुग्णालयांवर कारवाईफत्तेपूर व परिसरातील काही खाजगी डॉक्टर रुग्णांची कोरोना चाचणी न करता केवळ टायफॉइड व इतर रक्ताच्या चाचण्या करून अधिक प्रमाणात सलाइन लावत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या परिसरातील रुग्ण हे जामनेर उपजिल्हा रुग्णालयात रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी असल्यामुळे दाखल होत असल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.एस. पाटोडे यांनी इंदू हॉस्पिटल व विमल हॉस्पिटल यांची अचानक तपासणी केली. तपासणीत काही अनियमितता व काही अपूर्णता आढळून आल्या.या पथकात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश राजपूत, मलेरिया पर्यवेक्षक व्ही.एच. माळी, आरोग्य सहायक भागवत वानखेडे, पुरुषोत्तम वाणी, सुनील पाटील, कृष्णा शिंदे, अनंता अवचार, अमोल वाघ यांचा समावेश होता.तपासणी करण्यात आलेल्या दोन्ही डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आली.तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होईपर्यंत व अपूर्ण बाबींची पूर्तता होईपर्यंत वैद्यकीय सेवा तात्पुरत्या बंद ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक पदवी व प्रमाणपत्र वाघारी येथील डॉक्टरांकडे नसतानाही रुग्णांवर उपचार केले जात होते. आवश्यक कागदपत्रे जमा करेपर्यंत दवाखाना सुरू करू नये, अशी नोटीस बजावली आहे.-डॉ.राजेश सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी, जामनेर

टॅग्स :docterडॉक्टरJamnerजामनेर