शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात ‘आयएमए’तर्फे लवकरच ‘मेडिकल लायब्ररी’ची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 12:24 IST

डॉक्टरांसाठी सोय

ठळक मुद्देआयएमए सभागृहात उपलब्ध होणार विविध सोयीमदतीसाठी सरसावले हात

जळगाव : वैद्यकीय सेवा बजावत असताना त्यात काही संदर्भाची आवश्यकता असल्यास डॉक्टरांना हे संदर्भ वेळेवर उपलब्ध व्हावे, यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) जळगावच्यावतीने ‘मेडिकल लायब्ररी’ची सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.जळगाव आयएमएच्यावतीने गेल्या वर्षी आयएमए सभागृहाचा कायापालट करण्यात येऊन संपूर्ण सभागृह वातानुकुलीत करण्यात आले. यातील पुढील टप्पा म्हणून येथे अद्यायावत वाचनालय, सुसज्ज कार्यालय, स्वतंत्र शौचालय अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे आयएमएचे सचिव डॉ. विलास भोळे यांनी सांगितले. त्यानुसार येथे या सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम १६ आॅगस्टपासून हाती घेण्यात येणार आहे.‘मेडिकल लायब्ररी’तून डॉक्टरांना लाभवैद्यकीय शिक्षण घेत असताना या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात मोठे वाचनालय असते. त्याद्वारे विविध उपचार पद्धतींसह संबंधित इतर माहितीही मिळते. वैद्यकीय व्यवसाय सुरू झाल्यानंतर जळगावात अशी ‘मेडिकल लायब्ररी’च नसल्याचे आयएमए पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी आयएमए सभागृहात ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या ‘मेडिकल लायब्ररी’तून वैद्यकीय विषयाशी निगडीत विविध पैलूंची माहिती हवी असल्यास डॉक्टर मंडळी या ठिकाणी जाऊन पुस्तकांचे निवांतपणे वाचन करू शकतील. यातून उपचार व वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन उपलब्धीचीही माहिती मिळू शकणार आहे.सुसज्ज कार्यालयआयएमएचे कार्यालयदेखील असावे यासाठी आयएमए सभागृहातच सुसज्ज कार्यालय उभारण्याचे नियोजन असून त्याचेही काम पुढील आठवड्यापासून हाती घेण्यात येणार आहे.दुसºया टप्प्यात करण्यात येणाºया या कामांतर्गत या ठिकाणी महिला तसेच पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालयाचीदेखील सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.मदतीसाठी सरसावले हातआयएमए सभागृहात करण्यात येणाºया सुविधांसाठी शहरातील डॉक्टर मंडळी सरसावली असून अनेकांनी मदत केली आहे. यामध्ये ‘मेडिकल लायब्ररी’साठी डॉ. नरेंद्र दोशी यांनी मदत केली असून आयएमएसाठी मोठे कार्य करणाºया डॉ. स्वरुप लोढा यांच्या स्मरणार्थ डॉ. सुमन लोढा यांनी कार्यालयासाठी मदत केली आहे. याशिवाय डॉ. राजेश जैन, डॉ. वैशाली जैन, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. अजय शास्त्री यांनीदेखील मदत केली आहे. या सोबतच इतरही डॉक्टर मदतीसाठी इच्छुक असून त्यातून इतर कामे करण्यात येणार आहेत.शहरात ‘मेडिकल लायब्ररी’ नसल्याने ही सुविधा आयएमए सभागृहात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासोबतच इतरही सुविधा येथे करण्यात येणार आहेत.- डॉ. विलास भोळे, सचिव, आयएमए.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव