एम.एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:12 IST2021-07-23T04:12:09+5:302021-07-23T04:12:09+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागातील एम.एड. अभ्यासक्रमाच्या ५० जागांकरिता शासनाच्या सामाईक प्रवेश परीक्षा ...

एम.एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी बंधनकारक
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागातील एम.एड. अभ्यासक्रमाच्या ५० जागांकरिता शासनाच्या सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) मार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानुसार सीईटी परीक्षेसाठी २६ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे.
बीएड उत्तीर्ण व ॲपिअर किंवा पदवीसह डी.एड उत्तीर्ण असतील असे विद्यार्थी सीईटीसाठी पात्र असणार आहे. इच्छुक विद्यार्थ्याने सामाईक प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरावयाचे असून माहिती पुस्तिका, अर्ज व प्रवेश प्रक्रियेचे विहित शुल्क भरण्याची प्रक्रियाही १२ जुलै पासून वेबसाईटवर उपलब्ध आहे. सी.ई.टी. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २६ जुलै आहे. अधिक माहितीसाठी डॉ. मनिषा इंदाणी किंवा डॉ. संतोष खिराडे, प्रा. जयश्री शिंगाडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.