महापौरांची लसीकरण केंद्राला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:17 IST2021-03-25T04:17:04+5:302021-03-25T04:17:04+5:30
जयश्री महाजन यांनी रक्तपेढीला भेट देऊन पाहणी केली. येथे असलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. सर्वात सुरक्षित असलेल्या ...

महापौरांची लसीकरण केंद्राला भेट
जयश्री महाजन यांनी रक्तपेढीला भेट देऊन पाहणी केली. येथे असलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. सर्वात सुरक्षित असलेल्या ‘नॅट’ तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेबद्दल यांचे समाधान व्यक्त करीत रेडक्रॉसच्या कार्यकारिणी मंडळाचे कौतुक केले.
कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त असलेल्या रेमडीसिवीर हे इंजेक्शन उपलब्ध करून दिले जात असल्याने याचा रुग्णांना मोठा आधार होत असून या सामाजिक कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन महाजन यांनी दिले. महापौरांचा या वेळी रेडक्रॉसच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, कार्यकारिणी सदस्य सुभाष सांखला, जनसंपर्क अधिकारी उज्ज्वला वर्मा, केदारनाथ मेडिकलचे संचालक भानुदास नाईक, निरंजन पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. शंकर सोनवणे उपस्थित होते.