नगराध्यक्षांनीच केली अतिक्रमण काढण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST2021-06-04T04:14:03+5:302021-06-04T04:14:03+5:30
अमळनेर नगर परिषद नागरी क्षेत्रातील बोरी नदी व पिंपळे नाला नदीपात्राच्या मर्यादेपासून पूर नियंत्रण रेषेच्या आत झालेल्या अतिक्रमणामुळे नागरी ...

नगराध्यक्षांनीच केली अतिक्रमण काढण्याची मागणी
अमळनेर नगर परिषद नागरी क्षेत्रातील बोरी नदी व पिंपळे नाला नदीपात्राच्या मर्यादेपासून पूर नियंत्रण रेषेच्या आत झालेल्या अतिक्रमणामुळे नागरी क्षेत्रातील वसाहतीमधून दुर्गधीयुक्त सांडपाणी, वीटभट्ट्या, माठ-मडकी व्यवसाय आणि जैविक घनकचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास व जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच पावसाळ्यात पावसाच्या पुराच्या पाण्यामुळे नागरी वसाहतीत पाणी शिरत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास व जीवितास धोका निर्माण होण्याच्या घटना घडलेल्या आहेत.
अमळनेर नगर परिषद नागरी क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील बोरी नदी व पिंपळ्या नाला या दोन्ही नदीकाठाची मोजणी करून पूर नियंत्रण रेषेच्या आतील भराव करून झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांच्या आरोग्यास व जीवितास धोका निर्माण होत असल्याने ही अतिक्रमणे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५नुसार पावसाळ्यापूर्वी युध्द पातळीवर काढण्यात यावी, अशी मागणी नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.