पांडुरंगा तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST2021-07-22T04:11:47+5:302021-07-22T04:11:47+5:30

वाघडू, ता. चाळीसगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या वर्षांप्रमाणे यावर्षीही वाघडू येथे कोरोनाचे नियम पाळत गावातच पालखी मिरवणूक काढून ...

May Panduranga be the source of your devotion | पांडुरंगा तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे

पांडुरंगा तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे

वाघडू, ता. चाळीसगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या वर्षांप्रमाणे यावर्षीही वाघडू येथे कोरोनाचे नियम पाळत गावातच पालखी मिरवणूक काढून विठ्ठल, रुक्मिणीच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. यावेळी संपूर्ण गावात मिरवणुकी येथील जुन्या गावात पालखीची सांगता करण्यात आली. यावर्षीही भक्तगण पंढरपूरच्या दर्शनापासून दुरावल्याने वारीतील भक्तांचा हिरमोड झाला.

गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षीही आषाढी एकादशीला आपापल्या गावातच पालखी मिरवणुका काढून गावकऱ्यांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी दमदार पावसाच्या आगमनासाठी साकडे घातले. दरवर्षी विविध ठिकाणांवरून पायी दिंडीचा प्रवास करून विविध ठिकाणच्या पालख्या आषाढी एकादशीच्या एक दिवस अगोदर पंढरपुरात दाखल होतात. मात्र यावर्षी कोरोना निर्बंधांमुळे आपापल्या गावात पालखी मिरवणूक करून घरोघरी आरती केली, यावेळी वाघडू येथे आडबंगीनाथ भजनी मंडळाच्या वतीने टाळमृदंगाच्या गजरात रात्री ८ वाजता पालखी मिरवणूक काढली. यावेळी आबालवृद्धांसह गावकऱ्यांनी पालखी मिरवणुकीत सहभाग नोंदवला. यावेळी आडबंगीनाथ भजनी मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

210721\21jal_5_21072021_12.jpg

पांडुरंगा तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे

Web Title: May Panduranga be the source of your devotion