पारोळ्यात मुसळधार पावसाची हजेरी
By Admin | Updated: May 16, 2014 01:35 IST2014-05-16T01:35:57+5:302014-05-16T01:35:57+5:30
पारोळा : अवकाळी पावसाचे सत्र सुरूच असून आज सायंकाळी शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली.

पारोळ्यात मुसळधार पावसाची हजेरी
पारोळा : अवकाळी पावसाचे सत्र सुरूच असून आज सायंकाळी शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. यात कृषी उत्पन्न बाजार समितीत वाळत टाकलेल्या मक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कुठेही आर्थिक नुकसान झाल्याचे वृत्त नाही. आज दुपारपासून शहरात ढगाळ वातावरण होते. त्यातच पाच वाजेच्या सुमारास अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. बाजार समितीत वाळत टाकलेल्या मक्यात पाणी साचले. मका ओला झाल्याने व्यापार्यांना लाखो रुपयांचा फटका बसला. अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने बाजारपेठेत अनेकांची एकच तारांबळ उडाली. शेतात पडलेल्या कापसाचेही या पावसामुळे नुकसान झाले. तसेच मिरचीलाही पावसाचा फटका बसला. पावसाच्या आगमनाने सर्वांना गारव्याचा सुखद धक्का मिळाला. या पावसामुळे कुठे जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. (वार्ताहर)