रक्तदानाच्या चळवळीत पोलिसांचे भरीव योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST2021-07-18T04:13:10+5:302021-07-18T04:13:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तुम्ही दिलेले रक्त कुणाचा तरी जीव वाचवू शकते, असा संदेश देत नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४ ...

रक्तदानाच्या चळवळीत पोलिसांचे भरीव योगदान
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तुम्ही दिलेले रक्त कुणाचा तरी जीव वाचवू शकते, असा संदेश देत नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४ तास सतर्क असणाऱ्या पोलीस प्रशासनाने आज 'लोकमत'च्या रक्तदान चळवळीत भरीव योगदान दिले. ‘लोकमत रक्ताचं नातं’ या महायज्ञात औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या वतीने झालेल्या रक्तदान शिबिरात पोलिसांनीच नव्हे तर सामान्यांनीही रक्तदानासाठी पुढाकार घेतला. या शिबिरात तब्बल २४१ दात्यांनी रक्तदान केले.
शिबिराला सकाळी दहा वाजेपासून सुरुवात झाली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय तसेच धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालय यांच्या रक्तपेढींकडून रक्तसंकलन करण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, 'लोकमत'चे कार्यकारी संपादक रवी टाले, सहाय्यक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांच्यासह औद्योगिक वसाहत पोलिसांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, तुकाराम निंबाळकर, गोविंदा पाटील, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, गफूर तडवी, सतीश गर्जे, किशोर पाटील, सुधीर साळवे, योगेश बारी, सचिन पाटील, सचिन मुंढे, सिद्धेश्वर ढापकर, इम्रान सैय्यद, मुदस्सर काझी, गणेश शिरसाळे, मिलिंद सोनवणे, सुनील सोनार, असीम तडवी, चेतन सोनवणे, जितेंद्र राठोड, संदीप पाटील, राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रक्तपेढीकडून रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी अनिल पाटील, राजेश शिरसाठ, भरत महाले, रोहिणी देवकर, जनसंपर्क अधिकारी नीलेश पवार, अरविंद चौधरी, प्रभाकर पाटील व सुभाष सोनवणे यांनी रक्तसंकलनाचे कार्य केले.
६७ वर्षीय वृद्धांनी स्वत:हून केले रक्तदान
धानवड, कुसुंबा, चिंचोली, शिरसोली येथील पोलीस पाटील यांनी येत रक्तदान करून योगदान दिले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत रक्तदान सुरू होते. दरम्यान, यात सुप्रीम कॉलनी भागातील रहिवासी राधाकृष्णन मनाजी नवले ६७ यांनी स्वत: एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन रक्तदान केले. रक्तदान केल्याने कसलाही त्रास होत नाही, सर्वांनी रक्तदान करावे, असा संदेश त्यांनी दिला आहे.
आम्हीही मागे नाही...
पोलीस प्रशासनात निडरपणे सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस महिला कर्मचाऱ्यांनी या शिबिरात रक्तदान करून आम्हीही मागे नाहीत, तुम्हीही पुढाकार घ्या, असा संदेश महिलांना दिला आहे. यावेळी मीनाक्षी घेटे, सपना येरगुंटला, आशा सोनवणे, राजश्री बाविस्कर यांनी रक्तदान केले.