पातोंड्याजवळ अपघातात विवाहित तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 17:53 IST2019-05-30T17:52:11+5:302019-05-30T17:53:05+5:30
जीपने दिली मोटरसायकलला धडक

पातोंड्याजवळ अपघातात विवाहित तरुण ठार
पातोंडा ता.अमळनेर : नांद्री गावापासून अमळनेर रस्त्यावर दीड किलो मीटर अंतरावर आयशर व मोटर सायकलचा बुधवारी रात्री ९ वाजता अपघात होऊन पातोंडा येथील दुचाकीस्वार महेंद्र भिमराव सुर्वे हा ठार झाला.
पातोंडा येथील महेंद्र सुर्वे हा विवाहित तरुण कामानिमित्त धुळे येथे गेला होता. परत येत असताना चोपडा कडून केळीने भरलेल्या चारचाकीने जोरात धडक दिली. त्यात महेंद्र सुर्वे यांना डोक्याला जबर मार लागल्याने जागीच ठार झाले. यावेळी मोटर सायकलचा चुराळा झाला आहे. तर केळीचे वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाली आहे. महेंद्र सुर्वे यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व भाऊ असा परिवार आहे.