विवाहितेची मुलांसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 22:36 IST2020-05-21T22:13:04+5:302020-05-21T22:36:54+5:30

अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे एका विवाहितेने आपल्या मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी उघडकीस आली.

Married woman commits suicide by jumping into a well with children | विवाहितेची मुलांसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

विवाहितेची मुलांसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

अमळनेर : आपल्या दोघं लहान मुलांसह तरुण विवाहित महिलेने  विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील टाकरखेडा येथे सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली 

      टाकरखेडा येथील सचिन जिजाबराव पाटील हा 21 रोजी सकाळी सहा वाजता गावातील एक तरुण मजुराला घेऊन शेतात ठिबक नळ्या टाकण्यासाठी शेतात गेला होता. त्यानंतर  पत्नी भारती वय 32 ही आपले लहान मुले गजानन वय 12 व स्वामी  वय 7 या दोन्ही मुलांसह शेतात गेली. अकरा वाजेनंतर सचिनने सोबत आणलेल्या मुलाला घरी जाण्यास सांगितले. मात्र तो पायी जाईल त्यापेक्षा मी तुला सोडून देतो म्हणून तो त्याला घेऊन निघाला . मात्र काही अंतरावर गेल्यानंतर त्याला त्याची पत्नी दोघा मुलांना घेऊन विहिरीकडे येताना दिसली. बराच वेळ झाला अजून कसे येत नाही म्हणून बघायला गेले असता त्याला तिघे विहिरीत पडलेले दिसले. तेथेच त्याने आक्रोश सुरू केला . आजूबाजूला दोर व काहीच सुविधा नसल्याने गावातील लोकांना बोलावण्यात आले. सरपंच मंगलाबाई पाटील , पोलीस पाटील कविता पाटील यांच्यासह गावातील लोक घटनास्थळी पोहचले मात्र विहिरी 75 फूट खोल आणि त्यात सुमारे 40 फूट पाणी होते महिलेसह दोघे मुले तळाशी गेले होते. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तीन मोटारी मागवून विहिरीतुन पाणी काढणे सुरू केले. तब्बल अडीच तासांनंतर दहिवद येथील संदीप पाटील व तुषार पाटील यांनी विहिरीतून प्रेत बाहेर काढले . तिघांचे शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते.

Web Title: Married woman commits suicide by jumping into a well with children