अमळनेर तालुक्यातील भिलाली येथे विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 22:34 IST2020-06-18T22:31:31+5:302020-06-18T22:34:37+5:30
भिलाली येथे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

अमळनेर तालुक्यातील भिलाली येथे विवाहितेची आत्महत्या
अमळनेर : तालुक्यातील भिलाली येथे एका ३० वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १८ रोजी सकाळी सहापूर्वी घडली.
भिलाली येथील कल्पनाबाई समाधान पाटील वय या महिलेने स्वतःच्या राहत्या घरी छताच्या लाकडी सऱ्याला साडी बांधून गळफास घेतला. सकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलिस पाटील दगा बाबूलाल पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल भास्कर चव्हाण करीत आहेत. कल्पनाबाईचा पती मजुरी करतो. तिच्या पश्चात पती ८ वर्षाचा मुलगा व ६ वर्षाची मुलगी आहे.