भडगाव येथे विवाहीत महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 22:20 IST2019-09-06T22:20:45+5:302019-09-06T22:20:51+5:30

घटनेमागील नेमके कारण समजू शकलेले नाही.

Married woman commits suicide in Bhadgaon | भडगाव येथे विवाहीत महिलेची आत्महत्या

भडगाव येथे विवाहीत महिलेची आत्महत्या


भडगाव : येथील रोहीणी शेखर पाटील या २२ वर्षीय विवाहीत महीलेने राहत्या घराच्या बेडरुममध्ये सिलींग फॅनला नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याने तिचा मृत्यु झाला. ही घटना ५ रोजी शहरातील यशवंतनगर भागात रात्री ११.३० ते १२ वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत पोलीस पाटील भुषण रमेश पाटील यांनी दिलेल्या खबरीवरुन भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. ही घटना लक्षात येताच या महिलेला ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषीत केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे हे करीत आहेत. दरम्यान घटनेमागील नेमके कारण समजू शकलेले नाही.

Web Title: Married woman commits suicide in Bhadgaon