पाचोरा येथे विवाहितेवर सामुहीक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 14:34 IST2019-04-21T14:33:51+5:302019-04-21T14:34:37+5:30

दोघा आरोपींना अटक

Married rape on marriage in Pachora | पाचोरा येथे विवाहितेवर सामुहीक बलात्कार

पाचोरा येथे विवाहितेवर सामुहीक बलात्कार


पाचोरा : विवाहितेला भर रस्त्यावर एकटीला गाठून रिक्षात ओढून तारखेडा खु रस्त्याच्या बाजूला शेतात नेण्यात आले व या ठिकाणी या विवाहितेवर दोघांनी आळीपाळीने पाशवी बलात्कार केल्याची घटना पाचोरा घडलीे. ही घटना १९ रोजी सायंकाळी घडली असून या प्रकारणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, येथील एका दवाखान्यात सफाईचे करणारी विवाहिता ही १९ रोजी संध्याकाळी ६.३० चे सुमारास दवाखान्यातुन काम आटोपून घराकडे निघाली असता जारगाव चौफुलीच्या अलीकडे पिंटू उर्फ गोविंद दत्तू पुजारी (वय ३६) रा. हनुमान नगर पाचोरा व त्याचा साथीदार रिक्षाचालक नुरा फतू पटेल (वय ५०) रा. शिवाजीनगर पाचोरा हे रिक्षा घेऊन तेथे आले.विवाहितेला पाहताच तिला रिक्षात बसण्याचा आग्रह पिंटू याने केला. सदर महिलेला त्याचे हावभाव लक्षात येताच तिने नकार दिला.
पिंटू उर्फ गोविंद हा महिलेच्या शेजारीच रहात असून त्याने नकार दिल्यावर तिचा हात धरून रिक्षात ओढले. महिलेच्या तोंडावर रुमाल टाकून तोंड दाबून तिचा आवाज बंद केला व रेल्वे पुलाकडील तारखेडा रोड लगतच्या शेतात ते रिक्षा घेऊन गेले. या ठिकाणी पिंटू उर्फ गोविंद पुजारी व नुरा पटेल या दोघांनी आळी पाळीने तिच्यावर बलात्कार केला. याचबरोबर वाच्यता केल्यास खुनाची धमकी दिली तसेच या महिलेला रात्री ८.३० चे सुमारास परत जारगाव चौफुली वर सोडून आरोपी निघून गेले.
यावेळी हनुमान जयंती निमित्त गल्लीत कीर्तन सुरू असल्याने कीर्तन संपल्यावर झाला प्रकार पीडित महिलेने शेजारच्या नातेवाईकाला सांगितला.
याप्रकरणी पाचोरा पोलिसात भादवी ३७६ ड,३६३, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून तपास पीएसआय दत्तात्रय नलावडे करीत आहे. दरम्यान दोघे आरोपी विवाहित असल्याचे सांगण्यात आले.
आरोपीस नागरिकांकडून मारहाण
याबाबत रात्री ११ चे सुमारास महिलेने आरोपीचे नाव सांगत घडलीली घटना कथन केली असता हनुमान नगर भागातील रहिवाशांनी पिंटूला घरातून ओढत पोलिस स्टेशनपर्यंत मारहाण करीत धिंड काढली. पोलिसांनी पिंटूला ताब्यात घेताच दुसऱ्या आरोपीचेही नाव सांगितले. दोघांना पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून अटक केली. दरम्यान पीडित महिलेचा पती, सासरा, सासू हे नंनदकडे येवला येथे २ दिवसापासून गेले होते .पीडित महिला व तिची आजे सासू घरी होते. आरोपी हा पीडितेच्या घरासमोर रहात असल्याने महिलेच्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊन हा प्रकार केल्याचे सांगितले.

Web Title: Married rape on marriage in Pachora