विवाहितेची हत्या की आत्महत्या? नातेवाईकांचा संताप अनावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2017 12:49 IST2017-01-02T12:47:57+5:302017-01-02T12:49:20+5:30
जळगावातील वरणगावात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी परिसरात तोडफोड केल्यानं तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विवाहितेची हत्या की आत्महत्या? नातेवाईकांचा संताप अनावर
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 2 - वरणगाव शहरातील ट्रान्सपोर्ट मालक अकबर मिर्झा यांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी परिसरात तोडफोड केली. या प्रकरणात मध्यस्थी करायला गेलेले भुसावळमधील माजी नगरसेवक शेख आरीफ शेगनी यांच्या चारचाकी गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. समीना मिर्झा असे संशयास्पद मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
मिर्झा कुटुंब रविवारी रात्री नातेवाईकांच्या लग्नासोहळ्याहून वरणगावी परतले. यानंतर दुस-या दिवशी मिर्झा यांच्या पत्नी समीनाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मात्र समीना यांच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करत ग्रामीण रुग्णालयात संताप व्यक्त केला. यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
ॉ