पारोळ्यात दिराने केला विधवा वहिनीशी विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 05:44 PM2018-12-18T17:44:59+5:302018-12-18T17:48:25+5:30

पारोळ्यात मोठ्या भावाचे अकाली निधन झाल्यानंतर विधवा वहिनीला दोन मुलांसह स्विकार करीत एक आदर्श ठेवला.

Marriage with a widowed bridegroom in Paro | पारोळ्यात दिराने केला विधवा वहिनीशी विवाह

पारोळ्यात दिराने केला विधवा वहिनीशी विवाह

Next
ठळक मुद्देसमाजा पुढे ठेवला एक आदर्शनगराध्यक्ष करण पाटील यांनी दिली ११ हजार रुपयांची भेटश्रीक्षेत्र नागेश्वर येथे पार पडला विवाह सोहळा

पारोळा : पारोळ्यात मोठ्या भावाचे अकाली निधन झाल्यानंतर विधवा वहिनीला दोन मुलांसह स्विकार करीत एक आदर्श ठेवला. अमोलने घेतलेला धाडसी निर्णयाचे सर्व स्तरावरून स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष करण पाटील यांनी रोख ११००० रुपये भेट देत संसार उपयोगी वस्तू घेण्यासाठी ही मदत केली.
अमोलचा मोठा भाऊ सागर याचा पत्नी, दोन मुलांसह सुखी संसाराचा गाडा चालू होता. सागरचे मागील वर्षी अचानक अकाली निधन झाले. त्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. सागरची पत्नी व दोन मुलांचे कसे होणार याची चिंता सतावत असतांना अमोलच्या कुटुंबातील सर्वांनी विधवा वहिनी शी विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला. या निर्णयामुळे सुरुवातीला अमोल गोंधळला. मात्र दोन्ही बाजूच्या नातेवाईकांनी अमोल व विधवा वहिनी यांना विश्वासात घेतल्यानंतर लग्नाचा निर्णय झाला. श्रीक्षेत्र नागेश्वर ता.पारोळा येथे हा आदर्श विवाह पार पडला.

Web Title: Marriage with a widowed bridegroom in Paro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.