जळगाव शहरातील गेंदालाल मील भागातील विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 21:38 IST2018-03-13T21:38:47+5:302018-03-13T21:38:47+5:30
गेंदालाल मीलमध्ये राहणा-या हिना उर्फ कौसर रफिक शेख (वय २३) या विवाहितेन राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी साडे बारा वाजता उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील गेंदालाल मील भागातील विवाहितेची आत्महत्या
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, १३ : गेंदालाल मीलमध्ये राहणा-या हिना उर्फ कौसर रफिक शेख (वय २३) या विवाहितेन राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी साडे बारा वाजता उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, हिना या पती शेख रफिक शेख सलीम (वय २६) व मुलगा असे तिघं जण गेंदालाल मीलमध्ये वास्तव्याला होते. पती स्लाईडींग खिडक्या बनविण्याचे काम करतात. मंगळवारी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. दुपारी साडे बारा वाजता जेवणासाठी घरी आले असता दरवाजा उघडताच पत्नी गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आली. तत्काळ पत्नीला खाली उतरवून नातेवाईकांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
हिना यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार सतीश सुरळकर व निलेश पाटील यांनी जिल्हा रुग्णालय गाठले. मयताने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिलेली नाही. कारण अजून स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.