जळगावच्या आठवडे बाजारात गोंधळ

By Admin | Updated: June 1, 2014 00:48 IST2014-06-01T00:48:30+5:302014-06-01T00:48:30+5:30

आठवडे बाजाराच्या जागेवर सुमारे ३० हजार चौरस फूट जागेवर तारांचे कुंपण, वाळूचे ढीग, विटा, आसारी असे बांधकामाचे साहित्य तसेच शेड उभारल्याने दुकानदारांमध्ये प्रचंड गोंधळ माजला

Market clutter in Jalgaon week | जळगावच्या आठवडे बाजारात गोंधळ

जळगावच्या आठवडे बाजारात गोंधळ

 जळगाव : कासमवाडी-रचना कॉलनी परिसरातील आठवडे बाजाराच्या जागेवर सुमारे ३० हजार चौरस फूट जागेवर तारांचे कुंपण, वाळूचे ढीग, विटा, आसारी असे बांधकामाचे साहित्य तसेच शेड उभारल्याने दुकानदारांमध्ये प्रचंड गोंधळ माजला व संतापही व्यक्त झाला. अनेकांनी सकाळीच पंचमुखी हनुमान मंदिरामागील पूर्वीच्या जागी आपली दुकाने थाटण्यास प्रारंभ केला तर मनपा कर्मचारी-अधिकार्‍यांना पुरेशी माहिती नसल्याने त्यांनी ‘आहे त्याच जागेत दुकाने लावा, असा आग्रह धरत रस्त्यावर लावण्यास प्रतिबंध केला.यामुळे दुपार पर्यंत संताप आणि गोंधळाचे वातावरण होते. सुमारे १५० लोकांना दुकान लावायला जागा न मिळाल्याने त्यांनी मनपा प्रशासनाला शिव्याशाप देत आपला माल घरी परत नेणे पसंत केले. गिरणा ट्रेडर्सने ही जागा आपल्या मालकीची असून या पावणेचार एकर जागेत आम्हाला ३० हजार चौरस फूट जागा सर्वोच्च न्यायालयाने ३ वर्षापूर्वीच्या निकालानुसार दिलेली आहे, असा दावा केला आहे. यामुळे सोमवारी कागदपत्रांची पडताळणी केली जाईल व या आठवडेबाजाराबाबत निर्णय घेतला जाईल, असे मनपा सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान महापालिका आयुक्त संजय कापडणीस, उपमहापौर सुनील महाजन, स्थायी समितीचे सभापती नितीन लढ्ढा, नगरसेवक सुरेश दामू भोळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे व नगरसेवक अनंत जोशी आदींनी सायंकाळी बाजारस्थळी भेट देऊन पाहणी केली आणि दुकानदारांशी चर्चा केली. यावेळी अनेकांनी पर्यायी व सोयीच्या जागेची मागणीही केली. गिरणा ट्रेडर्सचा दावा पडताळल्यावर आठवडे बाजाराचे भवितव्य सोमवारी वा त्यानंतर ठरेल. ही पावणेचार एकर जागा गिरणा ट्रेडर्सच्या मालकीची आहे. त्यावर मनपाचे आरक्षण असले तरी कायद्याने आमचा ताबा आहे. त्यातील ३० हजार चौरस फूट जागा सर्वोच्च न्यायालयाने ३ वर्षापूर्वीच्या निकालानुसार आम्हाला दिलेली आहे. आता काहीही प्रकरण न्यायप्रविष्ट नाही. आमच्या जागेवर आम्ही कुंपण केलेले आहे. -खासदार ईश्वरलाल जैन, जागामालक सर्वोच्च न्यायालयाने ३।।। एकर जागा शाळा, प्ले ग्राऊंडसाठी आरक्षित केलेली आहे. तर खासदार ईश्वरलाल जैन, सुगनचंद राका, ज्वालाप्रसाद अग्रवाल इ. ७-८ जणांचा सहभाग असलेल्या गिरणा ट्रेडर्सला सर्वोच्च न्यायालयाने ३० हजार फूट जागा दिलेली आहे. पर्यायी जागा उपलब्ध करुन न देता मनपा नियमाविरुद्ध ही जागा आठवडेबाजाराकरिता वापरत आहे. -युसूफ मकरा, विकासक ही जागा मनपाची आहे. त्यावर शाळा आणि क्रीडांगणाचे आरक्षण आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मनपाच्या बाजूने लागलेला आहे. विधी अधिकारी दामोदर मोेरे हे परगावी गेलेले आहेत. ते आल्यावर सोमवारी ताजे निकाल असतील तर ते पाहू, समोरच्यांकडूनही कागदपत्र मागवू व योग्य तो निर्णय घेऊ. सध्या बाजाराच्या जागेवर जे काही काम केलेले आहे, ते विनापरवानगीने केलेले आहे. जर ही जागा संबंधितांची असेल तर पर्यायी जागेचाही विचार करू. -नितीन लढ्ढा सभापती. स्थायी समिती, महापालिका.

Web Title: Market clutter in Jalgaon week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.