चारचाकीसाठी विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST2021-02-05T05:57:29+5:302021-02-05T05:57:29+5:30
जळगाव : व्यवसायासाठी लागणारी चारचाकी घेण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणावेत म्हणून तरन्नुमबी सलमान खान (२५) या विवाहितेचा सासरच्यांनी ...

चारचाकीसाठी विवाहितेचा छळ
जळगाव : व्यवसायासाठी लागणारी चारचाकी घेण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणावेत म्हणून तरन्नुमबी सलमान खान (२५) या विवाहितेचा सासरच्यांनी छळ केला असून तिच्या फिर्यादीवरुन पती सलमान, सासू तबस्सूमबी, सासरे गुलजार खान,दीर शाहरुख व नणंद रोजमीन यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार विजय पाटील करीत आहेत.
कोठारी नगरात प्रौढाचा मृत्यू
जळगाव : कोठारी नगरातील गोकुळ रुपचंद सुतार (५०) यांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. नातेवाईकांनी दाखल केले तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला होता. कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.
पाचोरा डिवायएसपीपदी भारत काकडे
जळगाव : पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारीपदी भारत काकडे यांची नियुक्ती झाली आहे. ईश्वर कातकाडे यांच्या जागी त्यांची नियुक्ती झालेली आहे. कातकाडे यांना नियुक्तीचे ठिकाण अद्याप दिलेले नाही. काकडे हे अमरावती येथे सीआयडीला अपर पोलीस अधीक्षक होते. गृह विभागाने पाच डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.
एटीएम छेडछाड प्रकरणात बँकेची माहिती मागविली
जळगाव : एटीएममध्ये छेडछाड करुन दीड कोटी रुपयांचा डल्ला मारणाऱ्या रोशन बाळासाहेब अहेर (२८, रा.न्यायडोंगरी, ता.नांदगाव) व महेश शंकरराव सानप (४२,रा.चाळीसगाव) या दोघांची बँकेची माहिती व मालमत्तेची माहिती काढली जात आहे. सोमवारी दोघांना भडगाव न्यायालयात हजर केले जाणार आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.