शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

अनेक केळी उत्पादकांना विमा रकमांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 9:40 PM

शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्यासाठी केळी पीकविमा कंपनीने अक्षरशः रडकुंडीस आणले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग आणखीन संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देव्याजासह रकमा द्या : शेतकऱ्यांची विमा कंपनीकडे आर्त हाक

लोकमत न्यूज नेटवर्क

केऱ्हाळे, ता. रावेर  :  शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्यासाठी केळी पीकविमा कंपनीने अक्षरशः रडकुंडीस आणले आहे. भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांची ना दाद, ना पुकार घेतली जात असल्याने आता जावे कोणाकडे, असा प्रश्न केळी उत्पादकांना पडला आहे. तर, विमा कंपनीचा प्रतिनिधी कोणतेही उत्तर न देता मोजक्याच शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्यात धन्यता मानत आहे. 

सन २०१९-२० या कालावधीत फळ पीकविमा योजनेंतर्गत केळी पिकाचा विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना वादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी मिळणारी रक्कम अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेली नाही. गत ऑक्टोबर महिन्यापासून सतत भरपाईची अपेक्षा बाळगून असलेला शेतकरी अद्यापही या मदतीपासून वंचित आहे.  याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कंपनीचे कोणतेही कार्यालय नाही तसेच जिल्ह्यातील एकमेव प्रतिनिधी कोणाचे फोन घेत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांनी यापुढे काय करावे, हे कळेनासे झाले आहे. नेहमीच वादग्रस्त ठरलेली केळी पीकविमा योजना काही लोकांच्या हस्तक्षेपामुळे सामान्य शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसत आहे. कारण, यामध्ये मोजक्याच शेतकऱ्यांना जास्तीचा लाभ मिळत असल्यामुळे यामध्ये चिरीमिरीचा गंध येत असल्याचे अनेक शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.  शेतकऱ्यांसाठी असलेली योजना शेतकऱ्यांपेक्षा इतरांनाच लाभदायी ठरत आहे. 

व्याजासह रक्कम द्या 

नियमानुसार विमा कंपनीने लाभार्थी शेतकऱ्यांना वेळेच्या आत भरपाईची रक्कम देणे बंधनकारक आहे.  संबंधित कंपनी जर ही रक्कम वेळेच्या आत देण्यास असमर्थ ठरली तर जेव्हा ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल तेवढ्या विलंबासह १८ टक्के  रक्कम व्याजासह द्यावी, असा शासन निर्णय आहे. 

सुमारे ऑक्टोबर २०१९ पासून आतापर्यंत  सहा महिने विलंब झाल्याने यापुढे ही रक्कम भरपाई रक्कम तेवढ्या दिवसाचे व्याजासह मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे. याचे कारण शेतकऱ्यांना पैसा नसल्यामुळे पुढील शेतीची कामे करण्यासाठी व्याजाने पैसे घ्यावे लागले. 

शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याची तक्रार

न्हावी, ता.  यावल :  गेल्या अनेक वर्षांपासून केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कधी पाण्याची अडचण तर कधी विजेचा लपंडाव, कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी गारपीट, अशा अनेक संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. अवकाळी तसेच गारपीट यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या हातून जातो.    अशा आर्थिक कोंडीवर मात करण्यासाठी शासनाने हवामानावर आधारित केळी पीक विमा योजना लागू केली. परंतु या वर्षापासून या योजनेचे नियम, निकष किचकट करण्यात आले. जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकणार नाही. अशातच विमा कंपनीकडून एक टीम तयार करून नूतनीकरण केले जात आहे. 

कागदपत्रे देऊन कोंडी

त्यामध्ये शेतकऱ्यांकडून ७/१२ उतारे तसेच विमा हप्ता भरल्याची विमा कंपनीची पावती मागितली जाते. तसे पाहिले तर ७/१२ उतारा आधीच शेतकऱ्यांनी दिला आहे. तसेच ज्या कंपनीचा विमा घेतलेला आहे, त्याच कंपनीचा विमा भरलेला असल्याची पावती सदर टीम शेतकऱ्यांकडून मागणी करीत आहे. तसेच यासाठी शेतकऱ्यांकडून काही रकमेची मागणी होत असून हा विनाकारण     शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार होतो आहे. या प्रकाराकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे व लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावRaverरावेरYawalयावलagricultureशेतीCrop Insuranceपीक विमा