मनपातर्फे क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध अभियानाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:42 IST2020-12-04T04:42:06+5:302020-12-04T04:42:06+5:30

महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात सकाळी दीपप्रज्वलन, धन्वंतरी देवी व छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण ...

Manpatra launches tuberculosis and leprosy research campaign | मनपातर्फे क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध अभियानाला सुरुवात

मनपातर्फे क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध अभियानाला सुरुवात

महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात सकाळी दीपप्रज्वलन, धन्वंतरी देवी व छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभियानाची सुरुवात झाली. यावेळी उपमहापौर सुनील खडके, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, दवाखाना नियंत्रण समिती सभापती डॉ. विश्वनाथ खडके, नगरसेवक महेश चौधरी, शहर क्षयरोग अधिकारी डॉ.राम रावलानी उपस्थित होते.

या अभियानासाठी १ लाख ३० हजार ९८५ अशी लोकसंख्या निवडण्यात आली असून, या कार्यक्रमात ७५ पथक १५० कर्मचारी व १५ सुपरवायझर नियुक्त करण्यात आले आहेत. ते घरोघरी जाऊन लोकांशी क्षयरोग व कुष्ठरोग साठी तपासणी करणार असून, यामध्ये ज्यांच्यात लक्षणे आढळून येतील अशा रूग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी तपासणीसाठी येणाऱ्या पथकाला सहकार्य करण्याचे आवाहन महापौरांनी केले आहे.तसेच या कार्यक्रमाला डॉ.मनिषा उगले, पी. पी. एम. समन्वयक कमलेश अमोदेकर, पर्यवेक्षक दीपक नांदेडकर, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक मिलिंद भोळे, प्रशांत मोरे , प्रियका सुराणा, कुष्ठरोग पर्यवेक्षक एन. आर. पाटील, हेमंत कोळी व इतर कर्मचारी उपस्थित होते. .

Web Title: Manpatra launches tuberculosis and leprosy research campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.