शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

खंडणीसाठी डांबून ठेवल्याच्या प्रकरणात पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 6:32 AM

चाळीसगावचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक व सध्या मुंबईत असलेले होमगार्डचे पोलीस अधीक्षक मनोज लोहार व त्यांना मदत करणारा धीरज यशवंत येवले याला शनिवारी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

जळगाव : जिल्हा परिषदेच्या तत्कालीन सदस्याला पंचवीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी डांबून ठेवल्याच्या गुन्ह्यात चाळीसगावचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक व सध्या मुंबईत असलेले होमगार्डचे पोलीस अधीक्षक मनोज लोहार व त्यांना मदत करणारा धीरज यशवंत येवले याला शनिवारी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.जिल्हा न्या. पी. वाय. लाडेकर यांनी हा निकाल देताना तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विश्वासराव निंबाळकर यांना निर्दोष सोडले.चाळीसगावचे डॉ. उत्तमराव महाजन यांच्या कॉलेजच्या बांधकामात महाजन व ठेकेदारांचा वाद झाला. तिन्ही ठेकेदारांनी महाजन यांच्याविरुद्ध मनोज लोहार यांच्याकडे अर्ज दिला. गुन्हा दाखल न करणे, तसेच संस्थेतील गैरकारभार बाहेर येऊ न देण्यासाठी लोहार यांनी विश्वासराव पाटील व धीरज येवले यांच्यामार्फत डॉ. महाजन यांच्याकडे ६० लाखांची खंडणी मागितली. तडजोडीअंती २५ लाख रुपये देण्याचे ठरले. खंडणी न दिल्याने लोहार यांनी महाजन यांना एक दिवस डांबले. त्यानंतर, लोहार, निंबाळकर व येवले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. १६ जानेवारीला लोहार व येवले यांना न्यायालयाने दोषी ठरविले होते.