नाभिक कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मनोहर खोंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:14 IST2020-12-25T04:14:15+5:302020-12-25T04:14:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महाराष्ट्र नाभिक महामंडळ संलग्नित जळगाव जिल्हा नाभिक कर्मचारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात ...

Manohar Khonde as District President of Nuclear Employees Union | नाभिक कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मनोहर खोंडे

नाभिक कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मनोहर खोंडे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महाराष्ट्र नाभिक महामंडळ संलग्नित जळगाव जिल्हा नाभिक कर्मचारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मनोहर खोंडे यांची, तर उपाध्यक्षपदी संजय पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

नाभिक कर्मचारी संघटनेचा पदाधिकारी निवड कार्यक्रम हा नुकताच शानभाग सभागृहात पार पडला. यावेळी विभागीय अध्यक्ष नानाभाऊ शिरसाठ, नाभिक समाज जिल्हाध्यक्ष रवींद्र (बंटी) नेरपगारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

असे आहेत निवड झालेले पदाधिकारी

कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते मनोहर खोंडे यांची, तर उपाध्यक्ष म्हणून संजय पवार, कार्याध्यक्ष संजय वाघ, संपर्कप्रमुख किरण नेरपगार, सरचिटणीस विजय ठाकरे, जिल्हा प्रवक्ता कुणाल गालफाडे, प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र बहळकर, धनराज बोरनारे, नारायण श्रीखंडे, देवीदास बिरारी, चंद्रकांत निकम, प्रा.रितेश महाले पाचोरा, नंदलाल वाघ चोपडा, डॉ.राजेंद्र साळुंखे, केशव आहिरराव, रोहिदास वाघ, मंगेश पांडे, कमलाकर बनाईत यांच्यासह जिल्हा तालुका कार्यकारिणी पदाधिकारी यांना नियुक्तिपत्र देण्यात आले आहे. तसेच नाशिक बोर्डावर संचालकपदी नियुक्त संजय वाघ, एल.आय.सी.मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त रवींद्र सैंदाणे, डॉ. ईश्र्वर सोनगिरे यांना पीएच.डी मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवाजीराव बहाळकर, पृथ्वीराज सोनवणे, कुमार सिरामे, राजकुमार गवळी यांच्यासह जिल्हाभरातून कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन नरेश मुऱ्हेकर यांनी केले.

Web Title: Manohar Khonde as District President of Nuclear Employees Union