मनीष जैन पुन्हा निवडणूक लढणार

By Admin | Updated: June 16, 2014 12:40 IST2014-06-15T23:15:28+5:302014-06-16T12:40:13+5:30

माजी आमदार मनीष जैन हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच त्यांनी एका कार्यक्रमात विधानपरिषद व विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

Manish Jain will contest again | मनीष जैन पुन्हा निवडणूक लढणार

मनीष जैन पुन्हा निवडणूक लढणार

जळगाव- माजी आमदार मनीष जैन हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच त्यांनी एका कार्यक्रमात विधानपरिषद व विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देवून मनीष जैन हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. रावेर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून आपले नशीब अजमावले मात्र नशीबाने त्यांना साथ दिली नाही. भाजपाच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी त्यांना पराभूत केले. त्यानंतर मनीष जैन हे स्वस्थ न बसता त्यांनी आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेऊन त्यांनी विधान परिषद व विधानसभेची निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आता पवार त्यांना विधानपरिषदेसाठी संधी देतात की विधानसभेसाठी याकडे जनतेचे लक्ष लागून आहे. विधानसभेची निवडणूक जामनेर मधून लढणार की जळगावमधून याबाबतही मतदारांमध्ये उत्सुकता आहे.
--------
गेल्या वेळेस विधानपरिषदेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविली, ती माझे राजकीय गुरू आमदार सुरेशदादा जैन यांच्या आशीर्वादाने जिंकली. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्ष नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. नेतृत्वाचे आदेश असले तर विधानसभा किंवा विधानपरिषदेची निवडणूक लढेल.
-मनीष जैन, माजी आमदार.

Web Title: Manish Jain will contest again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.