शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मंगळसूत्र पडले अन् खुनाचा झाला उलगडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 22:25 IST

अनैतिक संबंधातून खून : जिनिंग कामगाराच्या खूनप्रकरणी महिलेच्या पतीला अटक.

विजयकुमार सैतवाल, जळगाव : कानळदा रस्त्यावरील शेतात जिनिंग कामगाराचा खून हा अनैतिक संबंधाच्या वादातून झाला असल्याचे पोलिस तपासात समोर आले असून कामगाराचे ज्या महिलेशी संबंध होते तिच्या पतीला तालुका पोलिसांनी अटक केले आहे. त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. घटनास्थळी सापडलेले मंगळसूत्र कोणाचे आहे, हे त्याच परिसरातील महिलेने ओळखले अन् या खुनाचा उलगडा झाला व खुनी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

कानळदा रस्त्यावरील आसोदा शिवारात लक्ष्मी जिनिंगच्या मागे शेतात सुरेश परमसिंग सोलंकी (२६) या जिनिंग कामगाराचा शनिवार, २० एप्रिल रोजी मृतदेह आढळून आला होता. त्याचा खून झाल्याचे घटनास्थळावरून लक्षात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी जिनिंगमध्येच कामाला असलेल्या कामगाराला अटक केली. त्याने खुनाची कबुली दिली असून त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मंगळसूत्र कोणाचे?घटनास्थळावर पोलिसांना मंगळसूत्र, पैंजण आढळून आले होते. त्यावरून पोलिसांनी तपासाचा धागा पकडत या मंगळसूत्राविषयी विचारणा केली. ज्या महिलेचे हे मंगळसूत्र आहे, तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच या खूनप्रकरणी तिच्या पतीवरही संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.

या पूर्वीही दोघांमध्ये वाद, आता खेळच खल्लासया खुनाचा तपास करताना पोलिसांनी तेथील काही कामगारांनाही विश्वासात घेतले. त्यांनी पोलिसांना सांगितले की, खून करणाऱ्याच्या पत्नीचे व मयताचे पाच ते सहा महिन्यांपासून अनैतिक संबंध होते. त्याची कुणकूण महिलेच्या पतीला लागल्याने त्याचे व सुरेश सोलंकीचे भांडणही झाले होते. ते कामगारांनी सोडवले. मात्र तरीदेखील शुक्रवार, १९ एप्रिल रोजी रात्री सदर महिला सुरेशला भेटण्यासाठी शेतात गेली. तेथे दोघेही झोपलेले आढळले. त्या वेळी मागचा-पुढचा कोणताही विचार न करता महिलेच्या पतीने सुरेशच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्याचा खेळ खल्लास करून टाकला.

दोन तासातच खुनी पोलिसांच्या जाळ्यातघटनास्थळावर सापडलेल्या वस्तू, मृतदेहाची स्थिती पाहता पोलिसांनी अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याच्या शक्यतेने तत्काळ तपास सुरू केला. यात पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा, सपोनि अनंत अहिरे, पोहेकॉ अनिल फेगडे, धनराज पाटील, प्रवीण पाटील, केतन पाटील, रामकृष्ण इंगळे, उमेश ठाकूर, प्रशांत ठाकूर, नरेंद्र पाटील, तुषार जोशी यांनी दोनच तासात संशयिताला ताब्यात घेत खुनाचा उलगडा केला.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव