शतपावली करणाऱ्या विवाहितेची मंगलपोत लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:56 IST2021-02-05T05:56:47+5:302021-02-05T05:56:47+5:30
जळगाव : आदर्शनगर परिसरात रस्त्यावर शतपावली करणाऱ्या कामिक्षी कुमार हेमंत चौधरी या विवाहितेची ४० हजार रुपये किमतीची १२ ग्रॅम ...

शतपावली करणाऱ्या विवाहितेची मंगलपोत लांबविली
जळगाव : आदर्शनगर परिसरात रस्त्यावर शतपावली करणाऱ्या कामिक्षी कुमार हेमंत चौधरी या विवाहितेची ४० हजार रुपये किमतीची १२ ग्रॅम वजनाची मंगलपोत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लांबविल्याची घटना शुक्रवारी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास घडली.
आदर्शनगरातील अमृतकलश अपार्टमेंट येथे तेजस उल्हास चौधरी हे काका, काकू, चुलतभाऊ व बहीण या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. चौधरी यांच्याकडे तीन दिवसांपूर्वी चेन्नई येथे राहणारा चुलतभाऊ हेमंत चौधरी व त्यांची पत्नी कामिक्षी कुमार हे आले आहेत. शुक्रवारी रात्री पावणे नऊ वाजता तेजस चौधरी हे वहिनी कामिक्षी कुमार यांच्यासोबत उज्ज्वल स्पाउटर शाळेजवळ शतपावली करीत असताना २० ते २५ वर्षे वयोगटांतील दोन तरुण दुचाकीने समोरून आले. एकाने कामिक्षीकुमार यांच्या गळ्यातील मंगलपोत हिसकावून आरटीओ कार्यालयाच्या दिशेने पसार झाले. या प्रकरणी तेजस चौधरी यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी करीत आहेत.