सापास आपटून मारणारे मांडवे बुद्रुकचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST2021-07-01T04:13:16+5:302021-07-01T04:13:16+5:30
जामनेर : बिनविषारी धामण सापास जमिनीवर आपटून ठार मारणारा व त्याचा व्हिडिओ काढणारा असे दोघे मांडवे बुद्रुक (ता. जामनेर) ...

सापास आपटून मारणारे मांडवे बुद्रुकचे
जामनेर : बिनविषारी धामण सापास जमिनीवर आपटून ठार मारणारा व त्याचा व्हिडिओ काढणारा असे दोघे मांडवे बुद्रुक (ता. जामनेर) येथील रहिवासी असून त्यांच्या विरोधात पहूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सापाला मारण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वन्यजीव प्रेमींकडून याचा निषेध केला गेला. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर वन विभागाने चौकशीचे आदेश दिले होते. साप मारणाऱ्याने दुचाकीवरून त्याला फरपटत नेले होते. दुचाकी क्रमांकावरून संशयितांची ओळख पटविण्यात आली.
जामनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील, वनपाल पी. व्ही. महाजन, वनरक्षक पी. व्ही. काळे, गणेश खंडारे, शब्बीर पिंजारी यांनी पहूर पोलिसांच्या मदतीने केलेल्या चौकशीत मांडवे बुद्रुक येथील कैलास चिंधू जाधव याने सापास मारल्याचे व देवानंद भीमराव जाधव याने व्हिडिओ व्हायरल केल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी सापास मांडवे ते वाकडी रस्त्यावर २ किमीपर्यंत फरपटत नेल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
फोटो ०१सीडजे १