मानव विद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:18 IST2021-03-09T04:18:32+5:302021-03-09T04:18:32+5:30

बालनिकेतन विद्यामंदिर जळगाव : कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्या मंदिरात महिला दिनानिमित्त महिला पालक व शिक्षकांचा सत्कार करण्यात ...

Manav Vidyalaya | मानव विद्यालय

मानव विद्यालय

बालनिकेतन विद्यामंदिर

जळगाव : कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्या मंदिरात महिला दिनानिमित्त महिला पालक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी, नीलेश नाईक, सारिका भास्कर, सीमा मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन उज्ज्वला जाधव यांनी केले. यशस्वीतेसाठी नरेंद्र वारके, राजेंद्र पवार, रशिदा तडवी, वंदना नेहते, श्रीकांत पाटील, राहुल धनगर, संगीता निकम, सुवर्णा सोनार, ज्योती सपकाळे, छाया पाटील, स्वाती याज्ञिक आदींनी परिश्रम घेतले.

सु. ग. देवकर विद्यालय

जळगाव : सौ. सु. ग. देवकर प्रायमरी स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त सरस्वतीचे व सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका साधना महाजन, शाळेच्या समन्वयिका लता छापेकर, शिक्षिका सपना नेमाने यांच्यासह इतर महिला शिक्षिका उपस्थित होत्या.

Web Title: Manav Vidyalaya