जळगाव : एकदा प्रेमविवाह झाल्यानंतरही ही बाब लपवून ठेवत आई, वडिलांनी जबरदस्तीने दुसऱ्याच मुलाशी लॉकडाऊनमध्ये थाटामाटात लग्न लावून दिले. त्यानंतर दुसऱ्याच महिन्यात प्रियकराने त्या तरुणाला व्हॉटसॲपवर काही फोटो पाठवून तू लग्न केलेली मुलगी माझी बायको आहे, आमचा प्रेमविवाह झाला असल्याचे कळविले. संतापलेल्या तरुणाने पत्नीसह तिच्या आई, वडील अशा सहा जणांविरूद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांचे ३ मे २०२१ रोजी औरंगाबादेत लग्न झाले. त्यानंतर मुलगी घरी आली, काही दिवस तिला घरी सोडून तो नोकरीच्या ठिकाणी गेला. नंतर पत्नीलाही घेऊन गेला. तेथे पत्नीची वागणूक व्यवस्थित नव्हती. ‘त्या’ फोटोंमुळे झाला उलगडा पतीच्या मोबाइलवर अनोळखी नंबरवरून मेसेज आला. त्यात तू ज्या मुलीशी लग्न केले आहे, तिच्याशी माझा प्रेमविवाह झाल्याचे त्याने सांगितले. तो प्रियकर तरुणाला पुण्यात भेटला. पतीने जळगाव गाठून पत्नीच्या आई, वडिलांना बोलावून घेतले. त्यांना त्या दोघांचे इतर फोटाे दाखविले असता त्यांनी घरातच मुलीला मारहाण करुन जावयाची माफी मागितली. आई, वडिलांनी जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचे तरुणीने पतीला सांगितले.
तू जिच्याशी लग्न केलंस, ती माझी बायको आहे; विवाहानंतर दुसऱ्याच महिन्यात मेसेज आला, अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 07:39 IST