शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दुकानावर पोहचण्यापूर्वीच डंपरची धडक, व्यावसायिक जागीच ठार

By विजय.सैतवाल | Updated: July 11, 2023 20:55 IST

उड्डाणपुुलावर डंपर चालकाकडून ओव्हरटेकचा प्रयत्न

जळगाव : भरधाव जाणाऱ्या डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील स्वप्नील सुरेश जोशी (३५, रा. देविदास कॉलनी) हे जागीच ठार झाले. जोशी हे आपल्या किराणा दुकानावर पोहचण्यापूर्वीच डंपर चालकाच्या बेपर्वाईने व्यावसायिकाचा जीव गेला. हा अपघात मंगळवार, ११ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकाच्या पुढील उड्डाणपुलावर झाला. डंपर चालक वाहन सोडून फरार झाला. 

स्वप्नील जोशी यांचे प्रेमनगरमध्ये किराणा दुकान आहे. मंगळवारी दुपारी ते आकाशवाणी चौकाकडून मानराज पार्ककडे दुचाकीवर (क्र. एमएच १९, बीएस ४१३) जात होते. आकाशवाणी चौक ओलांडून उड्डाणपुलावर ते पोहचले त्याच वेळी मागून आलेल्या भरधाव डंपर (क्र. एमएच १९, सीवाय ५७८८) दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वाराच्या डोक्याला जबर मार लागून ते खाली कोसळले. ही धडक एवढी जोरात होती की, दुचाकीस्वाराच्या कपाळावर जखम होण्यासह कपाळाचा भाग मध्ये दाबला गेला. तसेच दोन्ही कानातून रक्तस्त्राव सुरू झाला. 

घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पो.कॉ. हर्षद गवळी, चालक दीपक पाटील हे घटनास्थळी पोहचले व त्यांनी दुचाकीस्वाराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी मयत घोषित केले. 

चालक फरारअपघात होताच डंपर चालक वाहन सोडून पसार झाला. रामानंद नगर पोलिसांनी डंपर व दुचाकी पोलिस ठाण्यात जमा केली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात  नोंद करण्यात आली आहे. 

नऊ महिन्यांच्या मुलांचे पितृछत्र हरविलेस्वप्नील जोशी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे.  मुलगा ओजस हा चार वर्षाचा असून मुलगी समीक्षा ही तर नऊच महिन्यांची आहे. एवढ्या लहान वयात मुलांचे पितृछत्र हरविल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

वडील निवृत्त अधिकारीमयत स्वप्नील यांचे वडील पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यालयीन अधीक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच वाहतूक शाखेचे अनेक कर्मचारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहचले होते. 

डंपर उठले जीवावरशहर व परिसरातून दररोज दिवसभर  महामार्गासह वेगवेगळ्या रस्त्यांवरून भरधाव डंपर जात असतात. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने ते नागरिकांच्या जीवावर उठल्याचा आरोप केला जात आहे. सध्या वाळू उपसा बंद असला तरी मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचीही ये-जा सुरू असते. शिवाय वाळू उपसा करून आल्यानंतर पुन्हा वाळू भरण्यासाठी रिकामे डंपर वेगाने जात असल्याचे दररोज दिसून येते. यावर नियंत्रण आणावे, अशी मागणी होत आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगावDeathमृत्यू