'मामा-भाच्याची चौथी पिढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:31 IST2017-08-21T00:28:20+5:302017-08-21T00:31:05+5:30

शेतकºयांची भावना : अशी जोडी असते भाग्याची

'Mama-Bhachi's fourth generation | 'मामा-भाच्याची चौथी पिढी

'मामा-भाच्याची चौथी पिढी

ठळक मुद्देपोळ्यानिमित्त होते पुजाबैलांच्या या नात्याला अध्यात्मिकही महत्त्वशेतकºयांमध्ये उत्सुकता

संजय हिरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खेडगाव, ता-भडगाव : चंदा मामा से प्यारा मेरा मामा ...या हिंदी गीतातून मामा व भाचा यांचे नाते कसे पवित्र व घट्ट असते याचा महिमा सांगितला गेला आहे. असाच भावबंध मुक्या जितराबांनाही लागू पडतो की काय ? आपल्या दावणीला मामा-भाच्याची जोडी असणे भाग्याचे लक्षण ही भावना शेतकºयांमधे पिढ्यान् पिढ्यापासून चालत आलेली आहे. अशी एक नव्हे, दोन नव्हे, तर चौथी पिढी खेडगाव येथील विक्रम भावराव पाटील यांच्या दावणीला असल्याचा दुर्मियातील दुर्मीळ असा वृषभ योग जुळून आला आहे.
मी तुझा मामा..तो तुझा भाचा ....
विक्रम पाटील यांना लग्नात आंदण मिळालेल्या गायीचा हा विस्तार वेल आज वाढत जाऊन मुलगा दिलीप पाटील, नातू भैया पाटील यांच्यापर्यंत चौथी पिढीत आहे. पहिला बांड्या बैल. त्याचा भाचा मावळ्या. मावळ्याचा भाचा फराक्या. फराक्याचा भाचा फाट्या़ फाट्याचा भाचा खिल्लार असे रक्ताचे नातेसंबध येथे गुण्यागोविंदाने राबत आहे.
यातील बांड्या बैलाचे मागील वर्षी खुट्यावरच निधन झाले.
पाटील कुटुंब आपल्याकडे असलेल्या गायीचा वंश विकत नाही. त्यांची आजारपणात काळजी घेतली जाते़ तसेच खुराकाचीही बडदास्त ठेवली जाते.
शनी-शिंगणापूर येथील शनीदेवाची पाषाण मूर्ती नदीत मिळून आली खरी; पण ती जागेवरून हलेनाच तेव्हा कुण्या एका महात्म्याने नात्याने मामा-भाचा असलेल्या बैलजोडीच्या साहाय्याने तिला हलवण्याचा सल्ला दिला व चमत्कार घडला. अशा जोडीचा खेडोपाडी शोध घेण्यात आला तेव्हा कुठे ती मूर्ती हलवून आज आहे त्या चौथाºयावर बसविण्यात आली. तेव्हापासून अशा जोडीला भाग्यवान समजले जाऊ लागले. एका गायीपासून झालेला गोºहा व त्याच गायीच्या वासरीला झालेला गोºहा यांच्यात मामा भाच्याचे नाते असते. विक्रम पाटील यांच्या खुंट्यावर अशा मामा-भाच्यांच्या तीन जोड्या म्हणजे चौथी पिढी आहे. हादेखील एक विक्रमच म्हणावा लागेल.

 

 

Web Title: 'Mama-Bhachi's fourth generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.