शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मालती नेहतेंच्या वारसांना मिळणार ५ लाखाची नुकसान भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 22:46 IST

औरंगाबाद खंडपीठाचा निकाल : निकालापासून चार महिन्यात द्यावी लागणार रक्कम

जळगाव : भुसावळ येथील मालती नेहेते या वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवर न्यायालयाने गुरुवारी निकाल देताना जिल्हा रुग्णालयाचा निष्काळजीपणा आढळून आला. नेहेते यांच्या वारसांना पाच लाखांची नुकसान भरपाई निकाल लागल्यापासून चार महिन्यात शासनाने अदा करावी, असा निर्णय दिला आहे.मार्च २०२० पासून कोरोना विषाणूने जळगाव जिल्ह्यासह राज्यात थैमान घातले होते़ कोरोना काळात जळगाव जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित म्हणून उपचारासाठी दाखल असलेल्या मालती नेहेते (८२, रा. भुसावळ) या २ जून २०२० रोजी रुग्णालयातून बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर १० जूनला नेहेते यांचा मृतदेह रुग्णालयातील स्वच्छतागृहात आढळून आला होता. या घटनेने केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.जनहित याचिका केली दाखलरुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मालती नेहेते यांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे नेहेते यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, कमला बिऱ्हाडे (रा.अमळनेर) आणि रफीक तडवी (रा.उटखेडा, ता. रावेर) यांनी औरंगाबाद खंडपीठात २५ जून २०२० ला जनहित याचिका दाखल केली. यात नेहेते यांच्या वारसांना ३० लाखांची नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी न्यायालयाकडे दाद मागितली होती.खंडपीठाने दिला निकालऔरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती श्रीकांत कुळकर्णी व न्या. एस.व्ही. गंगापूरवाला यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर नुकताच या प्रकरणी निकाल दिला आहे. यात राज्य शासनाने मयत मालती नेहेते यांच्या वारसांना ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश दिले आहेत. ही भरपाई निकालापासून चार महिन्यात देण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे. त्याचबरोबर घडलेल्या घटनेच्या चौकशीबाबत नियुक्त तीन सदस्यीय समिती तसेच जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या चौकशी अहवालानुसार आढळून आल्या दोषींवर राज्याच्या मुख्य सचिवांनी तातडीने कार्यवाही करावी, असेही म्हटले आहे. याप्रकरणी याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. गायत्री सिंग व अ‍ॅड. अंकित कुळकर्णी यांनी कामकाज पाहिले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव