करा योग, रहा निरोग -शेखरसिंग चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 15:09 IST2019-06-21T15:09:10+5:302019-06-21T15:09:33+5:30

प्रत्येकाने योग करायलाच हवा, असे त्यांनी सांगितले. सन २००२ पासून ते योगसेवा देत आहे.

Make Yoga, Being Healthy - Shekharasingh Chavan | करा योग, रहा निरोग -शेखरसिंग चव्हाण

करा योग, रहा निरोग -शेखरसिंग चव्हाण


गोपाल व्यास
बोदवड : शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात योग शिक्षक असलेले तसेच महाराष्ट्र राज्य पतंजली योगचे जिल्हा निरीक्षक शेखरसिंग चव्हाण (वय ५२ ) हे योग प्रशिक्षणाचे कार्य विनामूल्य करीत आह. त्यांच्या या योगसाधनेमुळे ते परिचित असून शहरातील धनश्री सभागृह तसेच नंदाइ योग ध्यान केंद्रात ते दररोज सकाळी पाच ते सात या दोन तासात विना मूल्य योगाचे व प्राणायमाचे मार्गदर्शन करतात. त्यांच्या अनुभवानुसार योग साधनेने अशक्य ही शक्य केले जाते. तसेच नैराश्य दूर करण्याची कला ही योगात असून करा योग व रहा निरोग असे ते नेहमी सांगत असतात. योगामुळे अनेक शारीरिक व्याधी दूर होतात तसेच शरीर निरोगी राहण्यास मदत होते. यामुळे प्रत्येकाने योग करायलाच हवा, असे त्यांनी सांगितले. सन २००२ पासून ते योगसेवा देत आहे.

Web Title: Make Yoga, Being Healthy - Shekharasingh Chavan